AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Elections 2020 | उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेही बिहारच्या रणसंग्रामात उतरणार, शिवसेनेच्या 20 स्टार प्रचारकांची यादी

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. (Shivsena announced star campaigners for bihar vidhan sabha election 2020)

Bihar Elections 2020 |  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेही बिहारच्या रणसंग्रामात उतरणार, शिवसेनेच्या 20 स्टार प्रचारकांची यादी
| Updated on: Oct 08, 2020 | 10:19 AM
Share

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. नुकतीच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे. (Shivsena announced star campaigners for bihar vidhan sabha election 2020)

शिवसेना (Shiv Sena) बिहार विधानसभा निवडणुकीत  50 जागा लढवणार आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नाही. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

शिवसेनेच्या  स्टार प्रचारकांची नावे

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • आदित्य ठाकरे
  • सुभाष देसाई
  • संजय राऊत
  • चंद्रकांत खैरे
  • अनिल देसाई
  • विनायक राऊत
  • अरविंद सावंत
  • गुलाबराव पाटील
  • राजकुमार बाफना
  • प्रियांका चतुर्वेदी
  • राहुल शेवाळे
  • कृपाल तुमाने
  • सुनिल चिटणीस
  • योगराज शर्मा
  • कौशलेंद्र शर्मा
  • विनय शुक्ला
  • गुलाबचंद दुबे
  • अखिलेश तिवारी
  • अशोक तिवारी

शिवसेनेनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 20 नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच या निवडणुकांसाठी प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.

राष्ट्रवादींकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर 

दरम्यान काल (7 ऑक्टोबर) राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे.(Shivsena announced star campaigners for bihar vidhan sabha election 2020)

संबंधित बातम्या : 

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

Bihar Assembly Elections 2020 | बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांत निवडणूक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.