दिग्विजय सिंह यांची सुवर्ण पदक विजेती शूटर कन्या भाजपमध्ये

बिहारमधील दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी आज (4 ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश केला (Shooter Shreyasi Singh Daughter of Digvijay Singh join BJP).

दिग्विजय सिंह यांची सुवर्ण पदक विजेती शूटर कन्या भाजपमध्ये

नवी दिल्ली : बिहारमधील दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी आज (4 ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश केला (Shooter Shreyasi Singh Daughter of Digvijay Singh join BJP). श्रेयसी सिंह सुवर्ण पदक विजेत्या शूटर आहेत. त्यांनी भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भाजपचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रेयसी सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.

श्रेयसी सिंह यांची आई पुतुल सिंह खासदार होत्या. त्यांचे वडील जॉर्ज फर्नांडीस यांचे सहकारी आणि जनता दलाचे नेते होते. नंतर ते समता पार्टीत गेले. त्यांनी काहीवेळा बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं. तसेच ते दोनदा राज्यसभेवरही निवडून गेले. त्यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी भाजपचे महासचिव अरुण सिंह आणि बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला. श्रेयसी सिंह बिहारसभा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक रिंगणार असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाज राहिलेल्या श्रेयसी सिंह यांच्या राजकीय सक्रियतेबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चा नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून निवडणूक लढवण्याच्या होत्या. आता मात्र त्यांनी भाजप प्रवेशांवर शिक्कामोर्तब केला. श्रेयसी यांना 2018 मध्ये राष्ट्रमंडल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले होते. त्यांनी 2014 च्या ग्लासगो राष्ट्रमंडल स्पर्धेतही डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक मिळालं होतं. क्रीडा क्षेत्रातील त्यांचं योगदान पाहून त्यांना अर्जून पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. श्रेयसी यांच्या आई पुतुल सिंह बांका जागेवरुन लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. 2019 मध्ये हा मतदारसंघ जेडीयूकडे गेला.

संबंधित बातम्या :

Bihar Election: एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजप बाहेर, भाजप आणि जेडीयूला किती जागा?

बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी

तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन

Shooter Shreyasi Singh Daughter of Digvijay Singh join BJP

Published On - 9:36 pm, Sun, 4 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI