सिंगापूरमध्ये प्रयोगशाळेत तयार झालेल्या मांसाच्या विक्रीला मान्यता, कशी असणार चव?

सिंगापूरने अमेरिकेतील ‘जस्ट ईट’ या स्टार्टअप कंपनीला आपल्या देशात अशाप्रकारचे मांस विकण्याची परवानगी दिली आहे. | Lab Grown Meat

सिंगापूरमध्ये प्रयोगशाळेत तयार झालेल्या मांसाच्या विक्रीला मान्यता, कशी असणार चव?

सिंगापूर: सध्या जगभरात सिंगापूर अचानक प्रकाशझोतात आले आहे. याठिकाणी सरकारकडून प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या मांसविक्रीला (Lab Grown Meat ) परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता सिंगापूरमधील नागरिकांना कोणतीही पशूहत्या न करता मांस खाण्याचा आनंद घेता येणार आहे. ही बातमी ऐकून अनेकांना प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले मांस म्हणजे आहे तरी काय, असा प्रश्न पडला आहे. (Singapore becomes first country to approve lab-grown meat)

जगभरात गेल्या काही वर्षांपासून ग्रोन मीट अर्थात प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या मांसावर संशोधन सुरु होते. अखेर सिंगापूरने अमेरिकेतील ‘जस्ट ईट’ या स्टार्टअप कंपनीला आपल्या देशात अशाप्रकारचे मांस विकण्याची परवानगी दिली आहे.

कसे तयार होते ग्रोन मीट?

प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या मांसाला कल्चरड मीट किंवा क्लीन मीट देखील म्हटले जाते. ही संस्कृती जगभरात रुळली तर भविष्यात लोकांना पशूहत्या न करताच मांसाहार करता येणे शक्य होईल. हे मांस तयार करण्यासाठी बायोप्सीद्वारे पशूंच्या पेशी घेतल्या जातात. त्यानंतर बायोरिअ‍ॅक्टर्सच्या माध्यमातून या पेशींपासून मांस तयार केले जाते. यामध्ये अ‍ॅसिड, कार्बोहाइट्रेड, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचाही वापर केला जातो.

प्रयोगशाळेतील मांसाची चव कशी असते?

ग्रोन मीट तयार करणाऱ्या कंपन्यांकडून चिकन, बीफ आणि पोर्कची निर्मिती केली जाते. या सगळ्याप्रकारच्या मांसाची चव आपण नेहमी खातो तशी सामान्यच असते. आतापर्यंत झालेल्या परीक्षणांमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी नैसर्गिक मांस आणि ग्रोन मीटच्या चवीत फरक नसल्याचे म्हटले आहे.

हे मांस आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?

प्रयोगशाळेतील हे मांस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तयार करण्यात येते. त्यामुळे हे मांस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. या मांसाच्या सेवनामुळे आजार होण्याचा कोणताही धोका नाही. ग्रोन मीट तयार करताना अ‍ॅटिबायोटिक्सचा वापर होत नाही व अत्यंत स्वच्छ वातावरणात हे मांस तयार केले जाते. मात्र, काही दाव्यांनुसार नैसर्गिक मांसापेक्षा ग्रोन मीटमुळे पर्यावरणावर जास्त प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

ग्रोन मीटची किंमत काय असेल?

सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रोन मीट हे साध्या मांसाच्या तुलनेत खूपच खार्चिक ठरु शकते. प्रयोगशाळेत मांस तयार करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात हे मांस अत्यंत महाग असेल. मात्र, भविष्यात या मांसाची मागणी वाढल्यास उत्पादन खर्च कमी होऊन ग्रोन मीटची किंमतही कमी होऊ शकते.

(Singapore becomes first country to approve lab-grown meat)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI