यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू (Six people death due to electricity shock) झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू


यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू (Six people death due to electricity shock) झाला आहे. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील राळेगाव येथील गुजरी शिवारात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. अरुण गोंडे यांच्यासह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला (Six people death due to electricity shock) आहे.

गुजरी शिवारातील अरुण गोंडे हे कांहीदिवसांपासून गायी चरण्यासाठी शेतातील शेडमध्ये मुक्कामास होते. काल (29 मार्च) संध्याकाळी राळेगाव येथे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रात्री वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका गायीचाही मृत्यू झाला आहे.

या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या कुटुंबाच्या एकूण 50 गायी असून एक गायचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मृतांची नावं अद्याप समोर आली नसून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र शोक पसरला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI