Special Story: सोशल मीडिया वापरताना कुणाची प्रायव्हसी तर भंग करत नाही ना?

Special Story: सोशल मीडिया वापरताना कुणाची प्रायव्हसी तर भंग करत नाही ना?
social media, Facebook, WhatsApp

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत दैनंदिन आयुष्यातील गोष्यी शेअर करणं अगदी नॉर्मल झालं आहे. (Social media, Stars, Star Kids and Privacy)

VN

|

Jan 16, 2021 | 6:51 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणं, आपले फोटो शेअर करणं आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करणं अगदी नॉर्मल झालं आहे. अशात आपल्या लाडक्या कलाकारांचं रिलेशनशिप, साखरपुडा, लग्न, प्रेग्नेंसी, मुलं अशा अनेक पोस्ट आपण पाहतो आणि त्याचं अनुकरणसुद्धा करत असतो. मात्र सध्या विराट आणि अनुष्कानं उचललेलं पाऊल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय

एका मुलाखतीत अनुष्कानं ठामपणे सांगितलं होतं की, ती आणि विराट दोघंही आपल्या बाळाला माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यांचं मूल खोडकर होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. बाळाला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा निर्णय हा दोघांनी मिळून घेतला आहे. आम्ही याबद्दल खूप विचार केला. आम्हाला आमच्या बाळाला सोशल मीडियाच्या या जगात अडकवायचं नाहीये. हे जरा कठीण आहे मात्र आम्हाला हे करायचंय. एवढंच नाही तर सुरुवातीला सोशल मीडियावर आणि नंतर फोटोग्राफर्सला भेटवस्तू देत विराट आणि अनुष्कानं आवाहन केलं आहे की, कृपया आमच्या मुलीपासून लांब राहा. आता ‘टीव्ही 9 मराठी’ला मिळालेल्या माहितीनुसार, फॉटोग्राफर्सनी विराट-अनुष्काची ही विनंती मान्य केली आहे. त्यांनी विराट-अनुष्काच्या मुलीपासून लांब राहणार असल्याचं सांगितलं आहे.

यामागे काय कारण असावं असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर सोशल मीडियावर सध्या ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कदाचित आपल्या मुलाला/ मुलीला यापासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं असावं. नकळत्या वयात नको ते आरोप नको त्या गोष्टी त्या बाळाच्या कानावर पडू नये यासाठी हा निर्णय असावा.

हे फक्त विराट अनुष्काच्या बाबतीत मर्यादित नाहीये. करिना कपूर आणि सैफ अली खाननं सुद्धा तैमूरला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तैमूरच्या जन्मापासून त्याच्या सौंदर्यामुळे त्याच्या राहणीमानामुळे आणि त्याच्या वागणुकीमुळे नेहमी त्याला सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात आलं. कदाचित त्यामुळेच करिना कपूरनंसुद्धा तिच्या होणाऱ्या बाळाच्या वेळी जास्त सतर्क राहणार असल्याचं सांगितलं. तर काही दिवसांपूर्वी तैमूरला मिळणाऱ्या अटेंशनबाबत बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या की, अनुष्का-विराट हे एक लोकप्रिय जोडपं आहे. जेव्हा त्यांच्या मुलाचा जन्म होईल तेव्हा नेटकरी तैमूरला सोडून त्यांच्या मुलांकडे लक्ष देतील.

शर्मिला टागोर यांची काळजी

तैमूरची आजी शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत तैमूरला मिळत असलेल्या सोशल मीडिया अटेंशनबद्दल काळजी व्यक्त केली होती. ‘मला तैमूरची काळजी वाटते. तैमूर सध्या खूप लहान आहे. त्यामुळे त्याला सध्या काही कळत नाही, मात्र जेव्हा तो मोठा होईल आणि जर तेव्हा त्याला अटेंशन मिळालं नाही तर मग त्याच्यावर खूप परिणाम होतील. म्हणूनच आम्हाला त्याची काळजी वाटते, असं त्या म्हणाल्या होत्या. ’सोबतच शर्मिला यांनी मीडियाला एक विनंती देखील केली होती, ‘तैमूर खूप साधा आहे. त्यामुळे मीडियानं त्याच्या संदर्भात थोडं संवेदनशील राहावं.’ आपण सोशल मीडिया वापरत असताना कुणाच्या भावना, कुणाची प्रायव्हसी भंग तर करत नाही आहोत ना याचं भान ठेवणं आता खरच गरजेचं झालं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें