उजनी जलवाहिनीला मोठी गळती, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलवाहिनीला (Ujani Pipeline Leakage) मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभूर्णी बायपास रस्त्यावर लाखो लीटर पाणी वाया जात आहे.

उजनी जलवाहिनीला मोठी गळती, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प
Follow us
| Updated on: Aug 10, 2019 | 11:04 AM

सोलापूर : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलवाहिनीला (Ujani Pipeline Leakage) मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभूर्णी बायपास रस्त्यावर लाखो लीटर पाणी वाया जात आहे. आधीच सोलापुरात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. दरम्यान उजनी जलवाहिनीला (Ujani Pipeline Leakage) गळती लागल्याने या जलवाहिनीतून अक्षरश: 20 ते 30 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे बाहेर येत होते.

ऑगस्ट महिना उजाडला तरीही अद्याप सोलापुरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शहर धरणावर अवलंबून असलेल्या शहरांची मात्र चिंता मिटली आहे. पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे उजनी धरणात (Ujani Dam water level) 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.

गेल्या पाऊण तासांपासून उजनी ते सोलापूरपर्यंत पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला ही गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून महामार्गावरील वाहतूकही ठप्प करण्यात झाली होती. मात्र नुकतंच महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. त्यानंतर आता या जलवाहिनीच्या वरील बाजूचे वॉल बंद करुन गळती थांबवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

मात्र शेतात पेरणीसाठी अजूनही पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिथे पेरणी झाली, तिथे आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सात लाख लोकांना 396 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 273 चारा छावण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाला आश्रय देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.