भुसावळमध्ये ऑन ड्युटी जवानाची गोळी झाडत आत्महत्या

भुसावळमध्ये एका जवानाने ड्युटीवर असताना वापरात असलेल्या रायफलने स्वत:वर गोळी (Soldier suicide bhusaval) झाडून घेतली.

भुसावळमध्ये ऑन ड्युटी जवानाची गोळी झाडत आत्महत्या

जळगाव : भुसावळमध्ये एका जवानाने ड्युटीवर असताना वापरात असलेल्या रायफलने स्वत:वर गोळी (Soldier suicide bhusaval) झाडून घेतली. या धक्कादायक घटनेमुळे मिलिट्री परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भुसावळ शहरातील आरपीडी पॉइंटवर घडली. मंगेश भगत असं या जवानाचे (Soldier suicide bhusaval) नाव आहे.

शहरातील आरपीडी पॉइंटवर मंगेश भगत ड्युटीवर होता. या जवानाने स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मयत जवान हा भुसावळ येथे 13 फेबुवारी 2020 पासून नेमणुकीस आहे. मेस वाटर पंप भुसावळ येथे सेन्ट्री डयुटीवर कार्यरत होता. अचानक त्याच्या सहकाऱ्यांना रायफलमधून गोळी फायर झाल्याचा जोरात आवाज आला. यावेळी तातडीने त्याचे मित्र बाहेर आले. बाहेर मंगेश भगत जमिनीवर पडला होता. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI