AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सोनू सर, माझाही वाढदिवस शाहरुख खान सारखा साजरा करा’, चाहत्याच्या अजब मागणीवर सोनू सूद म्हणतो….

एका चाहत्याने ट्विटरवर एक वेगळी इच्छा व्यक्त केली. त्यावर सोनू सूदनेदेखील भन्नाट उत्तर दिलं (Sonu Sood Funny reply to fans demand).

'सोनू सर, माझाही वाढदिवस शाहरुख खान सारखा साजरा करा', चाहत्याच्या अजब मागणीवर सोनू सूद म्हणतो....
| Updated on: Nov 04, 2020 | 12:24 AM
Share

मुंबई : अभिनेता सोनू सूद सध्या सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव आहे. सोनू सूदने लॉकडाऊनदरम्यान शेकडो स्थलांतरित मजुरांना मदत केली. त्याच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणी कुठलीही मदत मागितली तर तो मदतीला धावून जातो. मात्र, मंगळवारी (3 नोव्हेंबर) एका चाहत्याने ट्विटरवर एक वेगळी इच्छा व्यक्त केली. त्यावर सोनू सूदनेदेखील भन्नाट उत्तर दिलं (Sonu Sood Funny reply to fans demand).

अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2 नोव्हेंबरला आपला 55वा वाढदिवस साजरा केला. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त जगातील सर्वात उंच ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीवर प्रकाशाच्या सहाय्याने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अगदी तशाचप्रकारच्या शुभेच्छा आपल्याही वाढदिवसाला देण्यात याव्या. यासाठी सोनू सूद यांनी मदत करावी, अशी विचित्र मागणी एका चाहत्याने ट्विटरवर केली. त्यावर सोनूने मजेशीर उत्तर दिलं.

“सोनू सर, 5 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसाचंही अशाचप्रकारे बुर्ज खलिफावर सेलिब्रेशन करुन द्या”, असं एक चाहता ट्विटरवर म्हणाला. या ट्विटला सोनूने भारी उत्तर दिलं. “बस तुमच्या जन्मदिवसाला फक्त 3 दिवसांसाचा उशिर झाला. असो, थोडी मेहनत करा आणि आयुष्यात नाव कमवा. मग बघा बुर्ज खलिफा काय आकाशात तुमचं नाव लिहिलं जाईल”, असं सोनू सूद म्हणाला.

दरम्यान, शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त सोनू सूदने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सोनूने शाहरुख सोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या (Sonu Sood Funny reply to fans demand).

हेही वाचा : ऑनलाईन अभ्यासासाठी ‘झाडावरची कसरत’, मोबाईल टॉवरसाठी सोनू सूदची मदत!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.