भिंतीवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी, यवतमाळमध्ये कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट

राज्यात कॉपीमुक्त अभियान सुरु असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे या अभियानाला सुरुंग लागला आहे (SSC paper leak).

भिंतीवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी, यवतमाळमध्ये कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट

यवतमाळ : राज्यात कॉपीमुक्त अभियान सुरु असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे या अभियानाला सुरुंग लागला आहे. महागाव येथे एका शाळेमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांचे नातेवाईक आणि मित्रांकडून कॉपी पुरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (SSC paper leak). या केंद्रावर 246 विद्यार्थी आहेत. त्यापैकी आजच्या पेपरला 4 विद्यार्थी गैरहजर होते.

दहावीच्या परिक्षेला आजपासून सुरुवात झाली. मराठी विषयाचा आज पहिलाच पेपर होता. मात्र, महागाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयामध्ये कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट दिसून आला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांचे नातेवाईक आणि मित्र शाळेच्या भिंतीवर चढून खिडकीमार्फत कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आलं आहे (SSC paper leak).

या परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असून सुद्धा असा प्रकार होत असल्याने सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच शिक्षण विभागाच्या गठित करण्यात आलेले पथके नेमके काय करतात? असा प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहे. शिवाय आजचा पेपर हा व्हॉट्सअॅपवरही व्हायरल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याचप्रमाणे तालुक्यातील इतर खासगी अनुदानित शाळेचे केंद्र राजकीय पदाधिकाऱ्यांची असल्याने या शाळेवर सर्रास कॉफी सुरु आहे. दरम्यान, शिक्षण विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप काही पालकांकडून केला जात आहे.

याअगोदर जळगावमध्येदेखील पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. जळगावमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हाट्सअॅपवर व्हायरल करण्यात आले आहेत.

दहावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. (Maharashtra Board SSC Exam Updates)

यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थींची वाढ आहे. तर 80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.

Published On - 3:57 pm, Tue, 3 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI