AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Most Search Celebrities 2020 | इंटरनेटवर सुशांत-रियाची सर्वाधिक चर्चा, याहूच्या ‘टॉप सर्च’ अहवालाची माहिती

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यामध्ये नाहीये. मात्र, सुशांतचे चाहते त्याला आजही विसरले नाहीत.

Most Search Celebrities 2020 | इंटरनेटवर सुशांत-रियाची सर्वाधिक चर्चा, याहूच्या ‘टॉप सर्च’ अहवालाची माहिती
| Updated on: Dec 02, 2020 | 5:40 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यामध्ये नाहीये. मात्र, सुशांतचे चाहते त्याला आजही विसरले नाहीत. याहूच्या नवीन अहवालानुसार 2020मध्ये लोकांनी इंटरनेटवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतला सर्वाधिक सर्च केले आहे. सर्च इंजिनने दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांना सुशांतच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अधिक जाणून घ्यायचे होते. त्यामुळेच सुशांत सिंह राजपूत नाव सर्वाधिक सर्च झाले आहे. यामुळे या वर्षी या ट्रेंडिंग यादीमध्ये प्रथम क्रमांकावर सुशांतचे नाव आहे. याहूने सुशांतला यावर्षी भारताच्या मोस्ट सर्च सेलिब्रिटीचा दर्जा दिला गेला आहे. (sushant singh rajput and rhea chakraborty  were the most searched celerities)

सुशांत सिंह राजपूतशिवाय इरफान खान, ऋषि कपूर आणि एसपी बालासुब्रमण्यन यांचा यावर्षी पहिल्या दहा बॉलिवूडमध्ये समावेश आहे. या यादीमध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान यांच्यासह इतरही अनेक नावे आहेत. या ‘टॉप सर्च’ यादीमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचाही समावेश आहे. ज्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही प्रथम क्रमांकावर आहे. तर, त्यापाठोपाठ कंगना रनौत, सारा अली आणि खान नेहा कक्कड़ यांचा आणि इतर बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. 1. सुशांत सिंह राजपूत २. अमिताभ बच्चन 3. अक्षय कुमार 4. सलमान खान 5. इरफान 6. ऋषि कपूर 7. एसपी बालासुब्रमण्यम 8. सोनू सूद 9. अनुराग कश्यप 10. अल्लू अर्जुन सर्वाधिक सर्च महिला सेलिब्रिटी 2020 1. रिया चक्रवर्ती 2. कंगना रनौत 3. दीपिका पादुकोण 4. सनी लिओनी 5. प्रियंका चोप्रा 6. कॅटरिना कैफ 7. नेहा कक्कड़ 8. कनिका कपूर 9. करीना कपूर खान 10. सारा अली खान

मृत्यूनंतर सुशांतच्या नावाची चर्चा गळफास घेत सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी आयुष्य संपवले. मात्र, त्याच्या चाहत्यांसह कुटुंबियांनीदेखील ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. आता या प्रकरणातील सीबीआय तपास अंतिम टप्प्यात आहे. एम्सच्या अहवालात सुशांतचा मृत्यू फाशी आणि गुदमरल्यामुळे झाला असल्याचे म्हटले आहे त्याच वेळी, या प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आला आहे. ज्यानंतर बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार या प्रकरणात अडकल्याचे लक्ष्यात आले. यानंतर एनसीबीने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल यांची चौकशी देखील केली. तर, सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. सध्या दोघेही जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

संबंधित बातम्या :

Jacqueline Fernandez | ‘ड्राईव्ह’ची वर्षपूर्ती, जॅकलीन फर्नांडिस सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावूक!

Sushant Singh Rajput | दिवाळीतही चाहत्यांकडून सुशांत सिंह राजपूतसाठी न्यायाची मागणी, बहीण श्वेता म्हणाली…

(sushant singh rajput and rhea chakraborty  were the most searched celerities)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.