AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत गुगलवर सतत आपली बातमी शोधायचा, कारण…..

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंदवले आहेत (Sushant Singh Rajput Case).

सुशांत गुगलवर सतत आपली बातमी शोधायचा, कारण.....
| Updated on: Jun 27, 2020 | 10:56 PM
Share

मुंबई :आपल्याविरोधात कुणीतरी काम करतंय (Sushant Singh Rajput Case). त्यामुळेच आपल्याविरोधात कुणीतरी बातम्या छापून आणत आहे, असं सुशांतला वाटायचं. त्यामुळे तो सतत गुगलवर आपल्याबाबत कुठली नकारात्मक बातमी आली आहे का? याचा शोध घेत असे”, अशी माहिती अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या जवळच्या दोन ते तीन व्यक्तींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे (Sushant Singh Rajput Case).

“सुशांत व्यसनी आहे. त्याचे बायकांशी संबंध आहेत. तो वेळ पाळत नाही, अशा नकारात्मक गोष्टी आपल्याविरोधात कोणीतरी छापून आणत आहे, असं त्याला नेहमी वाटायचं”, अशीदेखील माहिती सुशांतच्या जवळच्या व्यक्तींनी पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस त्यादृष्टीनेदेखील चौकशी करणार आहेत.

हेही वाचा : सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांच अशा चार वेगवेगळ्या तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंद केले आहेत. यात त्याची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीपासून बहिण, वडील, घरातील नोकर यांचा समावेश आहे. सुशांतची कायदेशीर सल्लागार अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानी हिचाही जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. याशिवाय पोलिसांनी सुशांतच्या चार्टर्ड अकाऊंटचाही जबाब नोंदवला आहे.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (14 जून 2020) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे. (Sushant Singh Rajput Final Post Mortem Report)

सुशांत दर दोन वर्षांनी मॅनेजरची टीम बदलायचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दर 2 वर्षांनी सुशांत आपल्या मॅनेजरची टीम बदलत होता. ही टीम त्याच्यासोबतच असायची. पोलीस सर्व मैनेजर्सचे जबाब घेत आहेत. त्यांनी दिलेले जबाबाची सत्यता तपासत आहेत. या प्रकरणात पुढे अजूनही तपास सुरु आहे.

रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी 

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब

त्याआधी पोलिसांनी कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली .

सुशांतच्या डायऱ्या जप्त

सुशांतच्या चार पाच डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करणं सुरु आहे. त्यात त्याने जनरल लिहलं आहे. वाचताना काही चांगला विचार असेल, तर तो ते नमूद करायचा. सुशांत हा 150 ड्रीमवर काम करत होता. आर्थिक आणि त्याच्या फिल्मशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही लोकांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.