…तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी बऱ्याच दिवसांनी आपलं मौन सोडलं आहे (Sushant Singh rajput Father K K Singh Allegations on Mumbai Police).

...तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 10:18 PM

पाटणा : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी बऱ्याच दिवसांनी आपलं मौन सोडलं आहे. त्यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. हे मी 25 फेब्रुवारी रोजीच वांद्रे पोलिसांना सांगितलं होतं. पण मुंबई पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. मुंबई पोलिसांनी तेव्हाच दखल घेतली असती तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता”, असा खळबळजनक दावा के. के. सिंह यांनी केला आहे (Sushant Singh rajput Father K K Singh Allegations on Mumbai Police).

“मुंबई पोलिसांकडे 25 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार करुनही त्यांनी काहीच केलं नाही. माझ्या मुलाचा 14 जून रोजी जीव गेला. त्यामुळे आम्ही आमच्या 25 फेब्रुवारीच्या तक्रारीनुसार कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आम्ही चाळीस दिवस वाट पाहिली. पण मुंबई पोलिसांकडून कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मी पाटणा येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली”, असं के. के. सिंह म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“पाटणा पोलिसांनी कारवाई सुरु केली. पण आरोपी पळून गेले आहेत. सध्या पाटणा पोलिसांना मदत करायला हवी. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि मंत्री संजय झा यांचा मी आभारी आहे. त्यांनी सत्याची साथ दिली आहे”, असंदेखील के. के. सिंह म्हणाले (Sushant Singh rajput Father K K Singh Allegations on Mumbai Police).

सुशांतच्या मृत्यूच्या 40 दिवसानंतर वडिलांनी पाटणा पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला. तीन पानी तक्रारीत त्यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीला वेगळे वळण लागले आहे. पाटणा पोलिसांचे पथक मुंबईत दाखल होऊन चौकशी करत आहे.

पाटणा पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचे मुद्दे

1. केवळ काही दिवसाच्या अवधीत सुशांतच्या बँक खात्यातून 11 कोटी रुपये काढले गेले. ते पैसै नेमके कुठे गेले. त्याचा तपास सुरु झाला आहे. या अंतर्गत पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेतही चौकशी केली आहे.

2. सुशांतने एक कंपनी स्थापन केली होती. त्यामध्ये रिया, तिचा भाऊही संचालक बोर्डात होता. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर या कंपनीतून रिया आणि तिच्या भावाने काढता पाय घेतला. त्यामुळे आता या कंपनीत नेमके काय सुरु होते, किती रुपयांचे व्यवहार या कंपनीच्या माध्यमातून झाले होते, या कंपनीत कुणाचा किती स्टेक किती होता, रिया आणि तिच्या भावाचा नेमका काय रोल होता, या सर्वांची सखोल चौकशी आता होणार आहे.

ईडी चौकशी करणार

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करणार आहे. याप्रकरणी ईडीने इन्फोर्समेंट केस रिपोर्ट नोंदवला आहे. ईडी आता सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करणार आहे. सुशांतचे बँक खात्याचे सर्व डिटेल्स तपासले जातील. आर्थिक व्यवहार काय आणि कसे झाले, याची चौकशी होणार आहे.

संबंधित बातम्या :

रियाने सुशांतच्या बँक खात्यातील 3 कोटी रुपये खर्च केल्याचं उघड

Sushant Suicide Case | पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.