पारनेरच्या शिक्षकाकडून ‘ऑनलाईन शाळा’ अ‍ॅपची निर्मिती, 900 शिक्षकांना प्रशिक्षण, शिक्षणासाठी विद्यार्थी सज्ज

ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या सर्व अडचणी लक्षात घेऊन पारनेरच्या एका तरुण शिक्षकाने एक अ‍ॅप तयार केलं आहे (Teacher made online school app for online classes in Parner).

पारनेरच्या शिक्षकाकडून 'ऑनलाईन शाळा' अ‍ॅपची निर्मिती, 900 शिक्षकांना प्रशिक्षण, शिक्षणासाठी विद्यार्थी सज्ज
कोल्हापूरात भरणार ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी

अहमदनगर : राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शाळेचा पर्याय समोर आला आहे. मात्र, यात अनेक अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या सर्व अडचणी लक्षात घेऊन पारनेरच्या एका तरुण शिक्षकाने एक अ‍ॅप तयार केलं आहे. पारनेरचे शिक्षक संदीप गुंड यांनी ‘ऑनलाईन शाळा’ हे अ‍ॅप तयार केलं आहे. या अ‍ॅपबाबत अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड चर्चा सुरु आहे (Teacher made online school app for online classes in Parner).

संदीप गुंड यांनी तयार केलेलं ‘ऑनलाईन शाळा’ हे अ‍ॅप 2 जी आणि 3 जी मोबाईलमध्येही चालणार आहे. त्यामुळे लवकरच पारनेर तालुक्यातील जवळपास सर्वच विद्यार्थी आणि शिक्षक आपला पाट्यक्रम ऑनलाईन सुरु करु शकणार आहेत. ऑनलाईन शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी समजावून घेत, विद्यार्थी आणि पालकांना सहज हाताळता येईल, अशा पद्धतीने हे अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. दरम्यान, या अ‍ॅपसाठी आमदार निलेश लंके यांनी संदीप गुंड यांना प्रचंड प्रोत्साहन आणि सहकार्य केलं आहे (Teacher made online school app for online classes in Parner).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून अ‍ॅपची निर्मिती

या अ‍ॅपची निर्मिती आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून झाली आहे. पारनेरमधील मुलांच्या शिक्षणासाठी एक नवीन ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित करावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी आमदार लंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने शिक्षण घेता यावं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यानुसारच त्यांनी या संदिप गुंड यांना यासाठी प्रोत्साहन आणि इतर सर्व सहकार्य केलं. याविषयी गुंड यांनी देखील आमदार निलेश लंके यांचे विशेष आभार मानले. तसेच याचे सर्व श्रेय आमदार निलेश लंके यांना दिले.

‘ऑनलाईन शाळा’ अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षक ऑनलाईन शिकवू शकतात. याशिवाय ते विद्यार्थ्यांना गृहपाठही देऊ शकतात. एवढंच नाही तर किती विद्यार्थी अभ्यास करत आहेत? याचीदेखील माहिती शिक्षकांना अ‍ॅपद्वारे मिळते. त्यामुळे हे अ‍ॅप तालुक्यातील संपूर्ण शाळांमध्ये वापरलं जाण्याची शक्यता आहे.

पारनेर तालुक्यातील शाळा, विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांची यादी तयार करुन सुमारे 15 हजार मुलांना या अ‍ॅपद्वारे शिक्षण देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी 900 शिक्षकांना सामावून घेत प्रशिक्षण दिलं गेलं आहे. प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना या अ‍ॅपचा उपयोग करुन शाळेसारखं शिक्षण देणं शक्य होणार आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहिली आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांना आमदार निलेश लंके यांनी मोबाईल उपलब्ध करुन देण्याचं अश्वासन दिलं आहे. या अ‍ॅपमुळे मोबाईलवर अभ्यास करण सोपं होणार असल्याची आशा वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक समाधानी आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI