घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे आज पहाटे झालेल्या अतिरेकी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना सज्जड दम भरला आहे.

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे आज पहाटे झालेल्या अतिरेकी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना सज्जड दम भरला आहे. सीमेवरून भारतात होणारा घुसखोरीचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न केल्यास एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच नरवणे यांनी दिला आहे. (Terrorists crossing LoC won’t be able to survive: Army Chief)

नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. या घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना तिथल्या तिथेच कंठस्नान घातल्या जाईल. हे अतिरेकी परत पाकिस्तानात जाऊ शकणार नाहीत. हा संदेश पाकिस्तान आणि त्यांच्या अतिरेक्यांसाठी पुरेसा आहे, असं नरवणे यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं.

यावेळी लष्करप्रमुख नरवणे यांनी तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमधून जाणाऱ्या अतिरेक्यांविरोधात भारतीय जवानांनी यशस्वी ऑपरेशन केल्याबद्दल जवानांचं कौतुक केलं. भारतीय सेना, जम्मू-काश्मीर पोलीस आणि अर्ध सैनिक दालातील उत्तम समन्वयामुळेच हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकल्याचं त्यांनी सांगितलं. सुरक्षा दलाने केलेलं हे अत्यंत यशस्वी ऑपरेशन होतं. सुरक्षा दलाच्या उत्तम समन्वय आणि सुसंगततेचं हे उत्तम उदाहरण होतं. त्यामुळे आमच्या देशात जो कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल त्याला अशा पद्धतीनेच परिणामाला सामोरे जावं लागेल, असा संदेशच या ऑपरेशनमधून गेला असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात आज पहाटे अतिरेकी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. या पार्श्वभूमीवर नागरोटा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या:

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक पोलीस जखमी

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था

(Terrorists crossing LoC won’t be able to survive: Army Chief)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI