महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! मुंबईत चार नवे जम्बो कोव्हिड सेंटर उभारणार

कोरोनाबाधितांचा दररोज वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकार मुंबईत आणखी चार मोठे कोव्हिड सेंटर तयार करण्याच्या तयारीत आहे (Thackeray government will make four Jumbo covid center in Mumbai)

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! मुंबईत चार नवे जम्बो कोव्हिड सेंटर उभारणार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 6:28 PM

मुंबई : कोरोनाबाधितांचा दररोज वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकार मुंबईत आणखी चार मोठे कोव्हिड सेंटर तयार करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे. मुंबईत दररोज दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिका मुंबईत आणखी चार जम्बो कोव्हिड सेंटर उभारणार आहे (Thackeray government will make four Jumbo covid center in Mumbai).

महापौरांनी नेमकं काय सांगितलं?

संबंधित कोव्हिड सेंटर हे मे महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असं महापौरांनी सांगितलं. मुंबईत 5300 बेड तर 800 आयसीयू बेड असलेले कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहेत. हे कोव्हिड सेंटर MMRDA, CIDCO, MHADA, BMC यांच्याअंतर्गत उभारले जाणार आहेत. या कोव्हिड सेंटरमुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होईल. तसेच मुंबईकरांनाही सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती महापौरांनी दिली.

मुंबईत नेमके कुठे चार जम्बो कोव्हिड सेंटर उभारले जाणार? कधी उपलब्ध होणार?

मुंबईत कांजूरमार्ग येथे 2000 बेड आणि 200 आयसीयू बेडचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे. हे कोव्हिड सेंटर MMRDA द्वारे बांधण्यात येईल. दुसरे जम्बो कोव्हिड सेंटर हे मालाड येथे CIDCO द्वारे उभारण्यात येणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्येही 2000 बेड आणि 200 आयसीयू बेड उभारले जाणार आहेत.

तसेच सोमय्या ग्राउंडवर म्हाडाच्या माध्यमातून कोव्हिड सेंटर उभारलं जाणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये 1000 बेड आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत. चौथा कोव्हिड सेंटर हा महालक्ष्मी येथे असणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये 300 बेड आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईत याआधी सहा जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये आणखी चार कोव्हिड सेंटरची भर होणार आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेला निश्चितच फायदा होईल (Thackeray government will make four Jumbo covid center in Mumbai).

हेही वाचा : लॉकडाऊन लागल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 63 हजार कोटी, कोणत्या योजनेद्वारे सरकारनं दिले पैसे?

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.