AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेच्या भव्य मोर्चावर ठाणे पोलिसांकडून ब्रेक, जिल्हाबंदीच्या आदेशामुळे गोंधळ

उर्जामंत्री आणि शासनाने त्याची दखल न घेता भरमसाठ आलेली बिले भरावीच लागतील या फार्मानावर मनसेने निदर्शनेही केली.

मनसेच्या भव्य मोर्चावर ठाणे पोलिसांकडून ब्रेक, जिल्हाबंदीच्या आदेशामुळे गोंधळ
| Edited By: | Updated on: Nov 25, 2020 | 10:29 PM
Share

ठाणे : भरमसाठ वीजबिलाबाबत अनेक आंदोलने मनसेच्यावतीने करण्यात आली. प्रशासनाशी पत्र व्यवहारही करण्यात आला. मात्र, उर्जामंत्री आणि शासनाने त्याची दखल न घेता भरमसाठ आलेली बिले भरावीच लागतील या फार्मानावर मनसेने निदर्शनेही केली. सर्वसामान्य जनतेचा आक्रोश शासन दरबारी पोहचवण्यासाठी मनसेने गुरुवारी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे. (thane District closure because of mns movement)

या मोर्च्यात मोठ्या संख्येने जिल्ह्याबाहेरील मनसैनिक येणार असल्याने जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे मनसैनिक हे जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना रोखण्यात येणार आहे. मनसेच्या मोर्च्याला संतप्त नागरिक मोठ्या प्रमाणात सामील होणार आहे. यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात करोनाचा प्रादुर्भावही वाढत असल्यामुळे ठाणे पोलिसांनी जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून याला मंजुरी देण्यात आली आहे.

कोरोनाचा काळ असल्याने एकीकडे जमावबंदी आहेच तर दुसरीकडे पूर्वीपासूनच 144 नियम लागू होत असल्याने ठाण्यात गर्दी करणं शक्य होणार नाही. त्यामुळे मनसेच्या नियोजित मोर्चाला ठाणे पोलिसांनी युक्ती लाऊन मनसेच्या मोर्चाला थेट जिल्हाबंदीचा ब्रेक लावल्याने मनसेचा मोर्चा निघणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (thane District closure because of mns movement)

गुरुवारी मनसेचे वाढीव विजबीलाबाबत आंदोलन कॅडबरी जंक्शन वरून खोपट सिग्नल मार्गे टेंभीनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा नियोजित मोर्चा आहे. मात्र, जिल्हाबंदीने मनसेच्या मोर्च्याला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. मनसे कार्यालयात मोर्च्याची तयारी संध्याकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे उद्या कदाचित मनसे आणि पोलीस रस्त्यावर आमने-सामने येणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, भव्य मोर्च्याबाबत मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस उपयुक्त यांनी बोलावून घेऊन ठाणे जिल्हाबंदी करण्यात येणार असल्याचे सूचित केले. आता मनसैनिकांना 149 नोटीसही बजावणार आलेत. हे सगळे अन्यायकारक आहे. यापूर्वी भाजपने अनेक मोर्चे काढले. पण मनसे रस्त्यावर उतरत असतानाच अशा प्रकारचा अन्याय करण्यात येतो आहे. पण मनसेचा मोर्चा हा निघणारच असा दृढ विश्वास मनसे पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या –

मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांचा नकार, पण मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम

मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेचा हिंदुत्वाचा नारा; परप्रांतियांचा मुद्दाही कायम; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

(thane District closure because of mns movement)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.