‘थँक्यू अजितदादा’! नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे हटके आभार

कोरोना संकट आणि कडक संचारबंदीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या मानधनाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवल्याने या विद्यार्थ्यांनी अजितदादांचे हटके आभार मानले आहेत. (thank you ajitdada, nursing students praises deputy chief minister ajit pawar)

'थँक्यू अजितदादा'! नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे हटके आभार
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:59 PM

सोलापूर: कोरोना संकट आणि कडक संचारबंदीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या मानधनाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुटकीसरसा सोडवला. त्यामुळे भारावून गेलेल्या या विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेऊन ‘थँक्यू अजितदादा’ म्हणत अजित पवार यांचे हटके आभार मानले आहेत. (thank you ajitdada, nursing students praises deputy chief minister ajit pawar)

कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळाज जीव मुठीत घेऊन सोलापूरमधील एएनएम आणि जीएनएममधील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन कोरोना सर्व्हे केला होता. त्यासाठी नर्सिंग महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांना पायपीटही करावी लागली होती. या विद्यार्थ्यांना त्या बदल्यात मानधन देण्याचं आश्वासन सोलापूर महापालिकेकडून देण्यात आले होते. मात्र, सर्व्हे झाल्यानंतरही या विद्यार्थ्यांना मानधन देण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी संतापले होते. या विद्यार्थ्यांनी थेट महापालिकेवर मोर्चा काढून मानधन देण्याची मागणीही केली होती. मानधन न दिल्यास सर्व्हे करण्याचं काम थांबवू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. मात्र, तरीही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

पवार येताच सूत्रे चक्रे फिरली

त्यानंतर दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी या विद्यार्थ्यांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्या पुढे समस्या मांडली. अजितदादांनीही या विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतल्यानंतर पालिका आयुक्तांना बोलावून घेतले. त्यानंतर अजितदादांनी या विद्यार्थ्यांचं मानधन 15 ते 20 दिवसांत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेशच दिले. अजितदादांच्या या आदेशानंतर चक्रे फिरली आणि विद्यार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा झाले.

230 विद्यार्थ्यांना मानधन मिळाले

अजितदादांनी आदेश दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी 230 विद्यार्थ्यी-विद्यार्थींनीच्या खात्यावर प्रत्येकी 10546 रुपये जमा केले. आमच्या खात्यावर हे पैसे जमा झाल्याने आम्ही अजितदादांचे हटके आभार मानत असल्याचे प्रिया शिंदे या विद्यार्थीनेने सांगितले.

अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता

आपल्या खात्यात मानधन जमा होताच या विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयाच्या पायरीवर बसून हातात फलक घेऊन अजितदादांचे आभार मानले. ‘थँक्यू अजितदादा’, ‘थँक्यू राष्ट्रवादी विद्यार्थी’ आणि ‘अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता म्हणजे अजितदादा’, असे फलक घेऊन हे विद्यार्थी कॉलेजच्या पायरीवर बसले होते. त्यांच्या या अनोख्या आणि हटके आभार प्रदर्शनाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. (thank you ajitdada, nursing students praises deputy chief minister ajit pawar)

संबंधित बातम्या:

ऑनलाईन परीक्षांमध्ये घोळात घोळ; पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर अभाविपचे जोरदार आंदोलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 8 डिसेंबरपासून बॅकलॉगची परीक्षा; सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार

उदय सामंतांची प्राध्यापकांसाठी मोठी घोषणा, तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

‘इग्नू’तील ऑनलाईन प्रवेशाची तारीख वाढवली; 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार

(thank you ajitdada, nursing students praises deputy chief minister ajit pawar)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.