AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटाची केस सुरु होती, पतीने मागितली पत्नीची किडनी, अजब मागणीने कोर्टही झाले अचंबित

कोर्टात घटस्फोटाची केस सुरु होती. कोर्ट निकाल देण्याच्या निष्कर्षापर्यंत आले. याचवेळी पतीने पत्नीची किडनी मागितली. पतीच्या या मागणीमुळे पत्नीला धक्का बसला. तर, कोर्टही पतीच्या या मागणीने अचंबित झाले.

घटस्फोटाची केस सुरु होती, पतीने मागितली पत्नीची किडनी, अजब मागणीने कोर्टही झाले अचंबित
Kidney NewsImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 4:06 PM

ब्रिटन | 22 फेब्रुवारी 2024 : अवयवदान हे सर्वात महान दान मानले जाते. आजकाल अनेक लोक इतरांसाठीही आपले अवयव दान करताना दिसतात. संपूर्ण जगात अवयव दानाची मोहीम उघडण्यात आलीय. त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. पण, ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कोर्टात घटस्फोटाची केस सुरु होती. कोर्ट निकाल देण्याच्या निष्कर्षापर्यंत आले. याचवेळी पतीने पत्नीची किडनी मागितली. पतीच्या या मागणीमुळे पत्नीला धक्का बसला. तर, कोर्टही पतीच्या या मागणीने अचंबित झाले. कोर्टाने ही मागणी मानवीदृष्ट्या चुकीची आहे असे म्हणत पतीची मागणी फेटाळली.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या रिचर्ड बॅटिस्टा याचे लग्न 1990 मध्ये डोनेल हिच्याशी झाले. या जोडप्याला तीन मुले आहेत. 2001 मध्ये डोनेल हिची तब्येत सारखी बिघडू लागली. डॉक्टर तपासणीत डोनेल हिच्या दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणे बंद केल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी डोनेल हिला किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. किडनी प्रत्यारोपण केले नाही तर जीव वाचवणे कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पत्नी डोनेल हिचा जीव वाचविण्यासाठी पती रिचर्ड याने आपली एक किडनी तिला दान केली. डोनेल हिचा जीव वाचला. ती आनंदात होतो. पण, किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर 4 वर्षांनी तिचे अन्य एका पुरुषासोबत प्रेमसंबध जुळले. त्यामुळे डोनेल हिने रिचर्डला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. यामुळे रिचर्ड खूप निराश झाला.

पत्नी डोनेलचे दुसऱ्याशी अफेअर, किडनी परत करावी

घटस्फोटाचा खटला नुकताच कोर्टात दाखल करण्यात आला. रिचर्ड याने कोर्टामध्ये पत्नी डोनेल हिचे दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा दावा केला. त्यामुळेच घटस्फोट घेत आहे. आपण आपली एक किडनी पत्नीचा जीव वाचविण्यासाठी दिली होती. मात्र, ती दुसऱ्यासोबत राहू इच्छिते त्यामुळे एक तर त्याला त्याची किडनी परत करावी किंवा किडनीच्या बदल्यात 1.2 मिलियन पौंड देण्यात यावेत अशी मागणी त्याने केली.

कोर्टाने काय म्हटले?

रिचर्ड याची ही मागणी ऐकून कोर्ट अचंबित झाले. त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांचे असे म्हणणे आहे की एकदा एखाद्याकडून किडनी घेतली की ती परत देणे शक्य नाही. यासाठी डोनेलला पुन्हा त्याच ऑपरेशन प्रक्रियेतून जावे लागेल. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे. ती किडनीही काढून टाकल्यास ती वाचणे अशक्य आहे. यानंतर मॅट्रिमोनिअल रेफरी जेफ्री यांनी निकाल देताना, रिचर्डची नुकसानभरपाई आणि किडनीची मागणी केवळ कायदेशीर उपायांच्या विरोधात नाही तर मानवी दृष्ट्याही चुकीची आहे असे म्हटले.

इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.