OTT Release 2021: प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार, ‘या’ प्रसिद्ध वेब सीरीज्सचे पुढील सीझन लवकरच प्रदर्शित होणार!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 8:58 AM

गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षकांमध्ये वेब सीरीजची क्रेझ वाढली आहे. खरं तर, वेब सीरीजमध्ये लोकांना टीव्ही शो व्यतिरिक्त सामग्री पाहायला मिळते आणि चित्रपटांची अनुभूती देखील मिळते. अशा परिस्थितीत प्रेक्षक वेब सीरीजची आतुरतेने वाट पाहत असतात.

OTT Release 2021: प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार, ‘या’ प्रसिद्ध वेब सीरीज्सचे पुढील सीझन लवकरच प्रदर्शित होणार!
Ott Series

मुंबई : ओटीटीने बऱ्याच काळापासून प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या माध्यमांत एक विशेष स्थान बनवले आहे. खरं तर, जेव्हा लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद होती, तेव्हा प्रेक्षक आणि निर्मात्यांच्या मनात एकच चिंता होती की, चित्रपट कुठे प्रदर्शित होतील आणि कधी प्रदर्शित होतील. अशा परिस्थितीत, ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाले, जे प्रेक्षकांना देखील खूप आवडले. तथापि, ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या रिलीजबरोबरच वेब सीरीजही इथे रिलीज केल्या जातात, ज्या प्रेक्षकांना जास्त आवडतात.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रेक्षकांमध्ये वेब सीरीजची क्रेझ वाढली आहे. खरं तर, वेब सीरीजमध्ये लोकांना टीव्ही शो व्यतिरिक्त सामग्री पाहायला मिळते आणि चित्रपटांची अनुभूती देखील मिळते. अशा परिस्थितीत प्रेक्षक वेब सीरीजची आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षी, ओटीटीवर धमाकेदार सीरीजच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी ओटीटीवर एक मोठी मेजवानी असणार आहे. अनेक लोकप्रिय सीरीजचे पुढील भाग यंदा रिलीज होणार आहेत

लिटील थिंग्स 4

कपलच्या नातेसंबंधात छोट्या छोट्या गोष्टी देखील किती महत्वाच्या असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे नातेसंबंध कसे मजबूत होतात, हे या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. आतापर्यंत या मालिकेचे तीन सीझन चांगलेच पसंत केले गेले आहेत आणि आता चौथा सीझन रसिकांसमोर सदर होणार आहे. मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे.

दिल्ली क्राईम सीझन 2

दिल्लीतील निर्भयाची घटना कोणीही विसरू शकत नाही. निर्भयासोबतच्या त्या वेदनादायक गुन्ह्यावर दिल्ली क्राईम सीरीज बनवली गेली. आता त्याचाच दुसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. शोमध्ये शेफाली शाह, रसिका दुग्गल सारख्या कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्याच वेळी, त्याच्या दुसऱ्या भागात काय दाखवले जाईल, हे जाणून घेणे मनोरंजक असणार आहे.

मिस मॅच्ड सीझन 2

रोहित सराफ, प्राजक्ता कोळी, रणविजय सिंह पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. डिंपल आणि ऋषीची कथा नवीन हंगामात पुढे जाईल. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये या सीझनबद्दलही खूप उत्साह आहे.

जामतारा 2

ऑनलाईनच्या युगात, जिथे लोकांना बऱ्याच सुविधा मिळाल्या आहेत, त्याचवेळी बरेच गुन्हेही झाले आहेत. फोन फसवणुकीद्वारे मुलांना कसे लुटले जाते, हे या मालिकेत दाखवण्यात आले. त्याची कथा प्रेक्षकांना आवडली, तर आता चाहते दुसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. ही सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

कोटा फॅक्टरी 2

कोटा फॅक्टरीचा पहिला हंगाम, जो कोचिंग सेंटर, क्लासेस, अभ्यास आणि कोटामध्ये असलेल्या तयारीची कथा दर्शवतो, तो प्रेक्षकांना खूप आवडला. ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या या सीरीजशी प्रेक्षकांना एक वेगळं नातं जाणवलं. आता त्याचा दुसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

हेही वाचा :

Nia Sharma : अभिनेत्री निया शर्माचे बोल्ड फोटो व्हायरल, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बिग बॉस तेलुगु’च्या घराची धुरा ‘मास’च्या हाती, पाहा एका भागासाठी किती मानधन आकारतो नागार्जुन अक्किनेनी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI