घरात कुणाला खोकला, ताप? सर्व्हेच्या नावे घरात घुसून चोरीचा प्रयत्न, वृद्धांना लुटणारी टोळी जेरबंद

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रशासनाकडून घरोघरी कोरोना सर्व्हे केला जात आहे. theft Attempt under the name of Corona Survey

घरात कुणाला खोकला, ताप? सर्व्हेच्या नावे घरात घुसून चोरीचा प्रयत्न, वृद्धांना लुटणारी टोळी जेरबंद

सातारा : कोरोनाच्या सर्व्हेसाठी आल्याचे सांगून एका वृद्ध दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न साताऱ्यात झाला. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेमुळे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या 4 जणांच्या टोळीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. (theft Attempt under the name of Corona Survey)

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रशासनाकडून घरोघरी कोरोना सर्व्हे केला जात आहे. याचाच संदर्भ घेऊन एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन लुटण्याचा प्रकार असफल ठरला. सातारा येथील रविवार पेठ इथे कोरोनाच्या सर्व्हेच्या नावाखाली घुसलेल्या चारजणांनी वृद्ध व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवत गळा दाबून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील वृद्ध महिलेच्या सतर्कतेमुळे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांचा डाव उधळला.

वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्यामुळे, आजूबाजूचे नागरिक सतर्क झाले. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या चार भामट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यातील पाच जणांपैकी दोघेजण स्थानिकांच्या हाती लागल्यानंतर त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या संकटकाळात लोकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, कोरोनाच्या सर्व्हेच्या नावाखाली हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोरोना काळात सर्वेक्षणाचा संदर्भ देऊन आता चोरट्यांनी घरात घुसण्याची अनोखी शक्कल लढवली असली, तरी अशा प्रकाराबाबत लोकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

(theft Attempt under the name of Corona Survey)

संबंधित बातम्या 

Pune Sero Survey | पुण्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पाच प्रभागात सिरो सर्व्हे, 51.5 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI