भिवंडी मनपा कम्युनिटी किचनमध्ये तांदळाची वानवा, 6 हजार कामगार दुपारी उपाशीच

भिवंडी शहरातही हजारो स्थलांतरीत परप्रांतीय मजूर/कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे (Thousands of labour are hungry in Bhivandi).

भिवंडी मनपा कम्युनिटी किचनमध्ये तांदळाची वानवा, 6 हजार कामगार दुपारी उपाशीच
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 8:22 PM

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे कोरोना नियंत्रणासाठी मदत होत असली तरी दुसरीकडे उद्योग व्यवसाय बंद झाल्याने कामगारांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. भिवंडी शहरातही हजारो स्थलांतरीत परप्रांतीय मजूर/कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे (Thousands of labour are hungry in Bhivandi). त्यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग समिती निहाय कम्युनिटी किचन सुरु केले. मात्र, येथेही तांदुळच नसल्याने दुपारचे जेवणच तयार करता आले नाही. त्यामुळे तब्बल 6 हजार नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती तयार झाल्याची तक्रार 15 हजार नागरिकांना जेवण देणाऱ्या धर्मराजा ग्रुपचे प्रमुख व नगरसेवक निलेश चौधरी यांनी केली आहे.

भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत लाखो परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सुरुवातीच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत भिवंडी शहरातील तब्बल 144 स्वयंसेवी संस्था पुढे येऊन या मजूर कामगार वर्गाच्या जेवणाची व्यवस्था केली होती. परंतु त्यानंतर पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांना जेवणाची व्यवस्था करणं अशक्य झालं. यानंतर शासनाच्या निर्देशानुसार भिवंडी महापालिका प्रशासनाने 5 प्रभाग समिती निहाय कम्युनिटी किचन सुरु करत या कामगारांना जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला. परंतु आज प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत प्रेमाताई पाटील सभागृहात सुरु असलेल्या कम्युनिटी किचनमध्ये तांदूळच शिल्लक नसल्यानं जेवण बनू शकलं नाही. त्यामुळे या कम्युनिटी किचनवर अवलंबून असलेले तब्बल 6 हजार नागरिक दुपारच्या जेवणाला मुकले आहेत.

महापालिका प्रशासनाकडून सुरु असलेलं कम्युनिटी किचन बंद असल्याची वार्ता समजल्यावर स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी दररोज जेवणाचे पाकीट घेऊन जाणाऱ्यांनी आपली मागणी एक दिवस आधी न कळवता जेवणाची पाकिटे वाढवून नेल्याचं सांगण्यात आलं. तसेच महापालिका प्रशासन फक्त 1 दिवस पुरेल एवढंच धान्य देत असल्याचंही सांगण्यात आलं. त्यामुळे हा प्रकार झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे येथून पुढे कम्युनिटी किचनमध्ये किमान 2 दिवस पुरेल एवढे धान्य द्यावे अशी मागणी संतोष शेट्टी यांनी केली आहे.

महापालिका प्रशासन आपल्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून मजुरांची भूक भागवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप धर्मराज ग्रुपचे प्रमुख नगरसेवक निलेश चौधरी यांनी केला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून दररोज धान्य उपलब्ध होत आहे. परंतु सोमवारी जेवण पॅकेट अधिक गेल्याने तांदूळ कमी पडले. त्याची माहिती दिल्यानंतर दुपारी तांदूळ कम्युनिटी किचन येथे उपलब्ध झाले. सायंकाळचे 5 हजार 500 पॅकेट तयार झाले. उद्या दोन वेळी पुरेल एवढे धान्य असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी दिली आहे. परंतु एवढी गंभीर परिस्थिती असताना त्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना नव्हती याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संबंधित बातम्या : Pune Corona Update | …तर 18 मेपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9600 पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त

मालेगावात दिवसभरात तब्बल 48 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 171 वर

Maharashtra Corona Live | नवी मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 43 नवे रुग्ण

यवतमाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 85 वर, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या वयोवृद्धांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय

Thousands of labour are hungry in Bhivandi

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.