प्रॅक्टीकल ऐवजी तोंडी परीक्षा, अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 3 पर्याय, विद्यापीठांना निवडीचे स्वातंत्र्य

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे (Final year Exam options in Maharashtra).

प्रॅक्टीकल ऐवजी तोंडी परीक्षा, अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 3 पर्याय, विद्यापीठांना निवडीचे स्वातंत्र्य
. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 4:02 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे (Final year Exam options in Maharashtra). यानुसार प्रयोगशाळेत जाऊन प्रात्यक्षिक (प्रॅक्टीकल) करण्याऐवजी विद्यार्थ्यांची व्हायवा घेतली जाणार आहे. तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. यात ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेंट बेस परीक्षा असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. विद्यापीठांना यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे.

गुरुवारी (3 सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर परीक्षेबाबत अंतिम स्वरुप निश्चित करण्यात आलं आहे. कुलगुरुंची समिती परीक्षेबाबतचा आपला अहवाल आज सरकारकडे सादर करणार आहे. अकादमी कौन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर परीक्षा मंडळाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवावा लागेल.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा देता यावी, असा आमचा आग्रह होता. या आग्रहाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंत म्हणाले होते, “घरात बसून परीक्षा घेण्याच्या पद्धती तीन ते प्रकारच्या आहेत. यात ऑनलाईन, ऑफलाईन, MCQ अशा प्रकारांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत. तारखा निश्चित झाल्यावर जाहीर करु. पण विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असं गृहित धरायला हरकत नाही.”

“31 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु शकतो”

उदय सामंत म्हणाले, “आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी (7/8 सप्टेंबरला) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन यूजीसीला परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विनंती करु. 31 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु शकतो, अशी भूमिका कुलगुरुंनी घेतली आहे. त्याबाबत आम्ही यूजीसीकडे पाठपुरावा करु.”

“15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याचं नियोजन कुलगुरु करत आहेत. प्रॅक्टीकल परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लॅबमध्ये जावं लागू नाही, अशा सूचना केल्या होत्या. त्याचप्रकारे अहवाल सादर करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा, अशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही कुलगुरुंना केल्या आहेत. कुलपती म्हणून राज्यपालांनीदेखील त्याच सूचना कुलगुरुंना केल्या आहेत”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

संबंधित बातम्या :

घरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा : उदय सामंत

दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती

संबंधित व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....