गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या गोरीपोरा भागात सीआरपीएफच्या जवानांवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर 45 जवान जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्या दरम्यान सीआरपीएफच्या अनेक बसेस होत्या. यामध्ये एकूण 2500 पेक्षा अधिक जवान होते.

दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या दोन बसला लक्ष्य केलं. अनेकदा जम्मू-काश्मीर, श्रीनगर येथे दहशतवाद्यांवर छोठ्या-मोठ्या कारवाया सुरु असतात. याशिवाय अनेक मोठे हल्लेही आतापर्यंत झाले आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीत देशातील गुरदासपूर, उरी सारख्या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईकही केली होती. मात्र तरी सुद्धा आजा पुलवामा येथे जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.

4 ते 5 वर्षात झालेले देशातील मोठे हल्ले

गुरदासपूर : जुलै 2015 मध्ये दहशतवाद्यांनी एका प्रवासी बसवर हल्ला केला होता. यानंतर त्यांनी दीनानगर पोसीस स्टेशनमध्ये घुसून फायरिंग केली होती. तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता आणि यामध्ये सात लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

पठानकोट : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जानेवारी 2016 मध्ये पठानकोटमधील वायू सेनेवर हल्ला केला होता. यामध्ये 3 जवान शहीद झाले होते. दरम्यान यावेळी भारतीय जवानांनीही 4 दहशतवाद्यांना मारले होते.

कोकराझार : ऑगस्ट 2016 मध्ये आसामच्या कोकराझारमध्ये एका हल्ल्यात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या दहशतवाद्यांनी केला होता.

उरी : उरीमध्ये भारतीय सैन्याच्या अड्ड्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. यामध्ये भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

अमरनाथ : जुलै 2017 मध्ये अमरनाथ यात्रेनंतर एस बस परतत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 लोक मारले गेले होते.

व्हिडीओ : शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी


Published On - 9:34 pm, Thu, 14 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI