20 गुंठ्यांवर टोमॅटोची लागवड, 6 लाखावर उत्पन्न, मनमाडच्या शेतकऱ्याची कमाल

शेतकरी गोरख सोनवणे यांनी त्यांच्या शेतात मका, कांदे, बाजरी, मिरची यासह अवघ्या 20 गुंठे जागेत टोमॅटोचे पीक घेतले

20 गुंठ्यांवर टोमॅटोची लागवड, 6 लाखावर उत्पन्न, मनमाडच्या शेतकऱ्याची कमाल

मनमाड : शेतकऱ्यांना नेहमीच अनेक अडचणींना तोंड देत शेती करावी लागते (Tomato Farming By Manmad Farmer). कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी पीक चांगले येऊन देखील भाव मिळत नाही. या अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी कसाबसा जगत आहे. मात्र, यावर मात करुन काही शेतकरी लाखो रुपये उत्पन्न मिळवत आहेत (Tomato Farming By Manmad Farmer).

मनमाड जवळील निमोण येथील प्रगतशील शेतकरी गोरख सोनवणे यांनी त्यांच्या शेतात मका, कांदे, बाजरी, मिरची यासह अवघ्या 20 गुंठे जागेत टोमॅटोचे पीक घेतले आहे. याला त्यांना अवघा 30 ते 35 हजार खर्च आला असून यात त्यांना 900 ते 1000 कॅरेट टोमॅटो उत्पादन झाले आहे. कमीतकमी 650 ते जास्तीतजास्त 800 रुपये प्रति कॅरेट भाव असल्याने त्यांना यातून 6 लाखाच्यावर उत्पन्न मिळणार असल्याचे गोरख सोनवणे यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही टोमॅटोचे पीक घेत आहे. मागील तीन वर्षांपासून टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने आम्ही टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकले होते. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोकडे पाठ फिरवल्याने टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने चांगला भाव मिळत असल्याचेही गोरख सोनवणे यांनी सांगितले (Tomato Farming By Manmad Farmer).

शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या शेतजमिनीत एकच पीक न घेता अनेक पीक घेत मिश्र पद्धतीने शेती करावी. एक पिकाला भाव नसला तरी दुसऱ्या पिकात त्याची भर नक्कीच निघते त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, असे गोरख यांचे बंधू खंडू सोनवणे सांगतात. शेतकऱ्यांनी गट पध्दतीने शेती केली. तर त्याचा फायदाच होतो, हेही त्यांनी सांगितले

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आपल्याकडे असलेल्या शेत जमिनींचा योग्य उपयोग केला, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. हे गोरख सोनवणे या शेतकऱ्याने दाखवून दिले.

Tomato Farming By Manmad Farmer

संबंधित बातम्या :

शिरुरमध्ये काश्मीर! ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड

काश्मीरमधील सफरचंदाची नाशिकमध्ये लागवड, डाळींबासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सफरचंदाची बाग

Published On - 4:32 pm, Tue, 6 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI