AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ एकर शेतीत कलिंगड, खरबुजाची लागवड, लॉकडाऊनमुळे लाखोंचा तोटा, जून महिन्यात झेंडूची लागवड, 62 लाखांचा नफा

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या एका शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात कलिंगड आणि खरबुजाची लागवड केली होती (Farmers big profit during lockdown).

आठ एकर शेतीत कलिंगड, खरबुजाची लागवड, लॉकडाऊनमुळे लाखोंचा तोटा, जून महिन्यात झेंडूची लागवड, 62 लाखांचा नफा
| Edited By: | Updated on: Sep 16, 2020 | 7:24 AM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या एका शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात कलिंगड आणि खरबुजाची लागवड केली होती (Farmers big profit during lockdown). पण लॉकडाऊनमुळे शेतमाल सडून गेला. यामुळे लाखोंचा फटका शेतकरी धोंडीभाऊ रामभाऊ भोर यांना बसला. पण यानंतरही भोर यांनी मोठा धोका पत्कारत झेंडुच्या फुलांची लागवड केली आणि या झेंडुच्या फुलांमुळे भोर यांना तब्बल 62 लाखांचा नफा झालेला आहे (Farmers big profit during lockdown).

भोर यांना झेंडुच्या फुलांमधून लाखोंचा फायदा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात त्यांची चर्चा सुरु आहे. कोरोना काळात लाखोंचा फटका सहन केल्यानंतर भोर यांनी झेंडुची लागवड केली. लॉकडाऊन काळात मंदिरे बंद होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी झेंडू उपटून फेकले. पण यादरम्यान मात्र भोर यांनी नशीब साथ देईल या आशेवर त्यांनी आपल्या शेतात झेंडुची लागवड केली.

झेंडुची लागवड करताच त्यांनी नशिबानेही साथ दिली. भोर यांच्या झेंडूला किलोला 100 रुपयांपासून 180 रूपयांपर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला आणि भोर यांना आठ एकर झेंडूतून तब्बल 70 लाख रुपये मिळाले. खर्च वजा करता भोर यांना झेंडूतून 62 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

लॉकडाऊनमुळे भोर यांना झेंडू तोडणीसाठी मजुरांची मोठी टंचाई जाणवत होती अशा काळात भोर यांच्या कुटुंबातील मुलांनी त्यांना मोठी मदत केली. कॉलेज बंद असल्याने उच्च शिक्षणासाठी बाहेर असलेले मुले-मुली घरी आले होते. त्यांनी आई-वडीलांना शेतातील कामात मदत केली. सर्वांनी एकीने शेतात मेहनत करतं काबाडकष्ट केले आणि नशिबाने साथ दिली. कष्टाचे चिज झाले आणि झेंडूने भोर कुटूंबीयांना लखपती बनवले.

नेहमीच संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाने संकटावर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतात काबाडकष्ट केले आणि शेतीतून चांगला नफा मिळवला.

संबंधित बातम्या :

Chandrapur | पावसाने दडी मारल्याने सोयाबीन शेतकरी संकटात, पिकांवर कीडरोगाचा प्रार्दुभाव

Beed News | बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकरी संकटात, मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक भुईसपाट

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.