Pune crime | दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुलींवर अत्याचार; गुन्हे दाखल

एकाच कंपनीत कामाला असलेल्या आरोपी व पीडित तरुणी यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर सातत्याने एकत्रित जेवण बनवण्याच्या बहाण्याने पीडितेला आरोपीने त्याच्या राहत्या घरी बोलावले. पुढे प्रेमाचे नाटक करत पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Pune crime | दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुलींवर अत्याचार; गुन्हे दाखल
Girl

पुणे – पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतं आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या भागात तरुणींवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पिंपरीमध्ये २६ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणीने वाकड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी गणेश सुधाकर पारटकर (वय २६, रा. थेरगाव) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना थेरगाव आणि रावेत येथे १३ मार्च २०२० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली.

एकत्र जेवणाच्या बहाण्याने केली मैत्री याबाबतची माहिती अशी की एकाच कंपनीत कामाला असलेल्या आरोपी व पीडित तरुणी यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर सातत्याने एकत्रित जेवण बनवण्याच्या बहाण्याने पीडितेला आरोपीने त्याच्या राहत्या घरी बोलावले. पुढे प्रेमाचे नाटक करत पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे आरोपीने पीडितेला रावेत येथील लॉजवर नेत जबरदस्तीने शरीर संबंध केले. पीडितेने आरोपीला लग्न कारण्याबाबत विचारले असता, आरोपीने कारणे देत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी पीडितेला आरोपीने मी दुसऱ्या मुली सोबत लग्न केले असल्याची माहिती दिली. या घटनेचा पीडितेला जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतरही आरोपीने पीडितेसोबत सातत्याने जबरदस्ती करॅट शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तारा पीडितेला मारहाणही केल्याची माहिती पीडितेने दिली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दुसरीकडे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात १७ वर्षीय मुलाने १५ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळस यथील महिलेने धानोरीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  आरोपी मुलाने पीडित मुलीला लोहगाव येथील लॉजवर नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. इतकच नव्हे तर ऑक्टोबर २०२१मध्येही मुलीच्या घरासमोरून शिवीगाळ करत तिच्या हाताला धरत बरोबर चालण्यास सांगितले मात्र पीडितेने विरोध करताच तिला मारहाण केली.

हेही वाचा: 

Video | जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप; दीड वर्षापर्यंत दररोज मोफत 6 जीबी इंटरनेट डेटाही

Video | जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली

Published On - 5:02 pm, Sat, 13 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI