सर्वसामान्यांसाठी ‘गोड’ बातमी! फळांची आवक वाढल्याने किंमती घसरल्या, वाचा नवे दर

मुंबई एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढल्याने सफरचंद आणि सीताफळांच्या किंमती घसरल्या आहेत.

सर्वसामान्यांसाठी 'गोड' बातमी! फळांची आवक वाढल्याने किंमती घसरल्या, वाचा नवे दर
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 6:26 PM

मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज एकूण 350 गाड्यांची आवक झाली आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठलं होतं. मात्र, आता फळांची आवक वाढल्यामुळे किंमतींमध्येही घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढल्याने सफरचंद आणि सीताफळांच्या किंमती घसरल्या आहेत. (total 350 vehicles arrived at the Mumbai APMC Fruit Market today)

आज फळ बाजारात सफरचंदाची 11 हजार क्विंटल आवक झाली असून सफरचंदाच्या किंमतीत घसरण झाली आहे. 150 रुपये किलो दराने विकला जाणारा सफरचंद सध्या बाजारात 60 ते 70 रुपये दराने विकला जात आहे. तर सीताफळाची आवक एक हजार क्विंटल झाली असून सीताफळ 10 ते 30 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. तसंच डाळिंबाची आवक 1080 क्विंटल झाली असून 35 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. तर मार्केटमध्ये 2100 संत्रींची आवक झाली आहे. त्यामुळे संत्र्यांच्या भावातही घसरण झाली असून 30 रुपये प्रतिकिलोने बाजारात विकली जात आहे.

सफरचंदाचे भाव घसरले हिमाचल, काश्मीर, शिमला, कुनुर या ठिकाणांहून सफरचंदाची मोठी आवक फळ मार्केटमध्ये झाल्याने सफरचंदाचे भाव घसरले आहेत. मात्र, किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यामुळे दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे. (total 350 vehicles arrived at the Mumbai APMC Fruit Market today)

सीताफळाची आवक वाढली सोलापूर, अकोला, नगर, शिरूर या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात सीताफळाची आवक झाली आहे. तसेच सध्या फळ बाजारात हनुमान, गोल्डन, सुपर गोल्डन, काटेरी बाळापुरी, महानगरी अशा वेगेळ्यावेगळ्या प्रकारच्या सीताफळाची विक्री केली जात आहे. मात्र, एपीएमसी फळ मार्केटमध्ये सीताफळामध्ये किडे असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गोल्डन सीताफळ या प्रकारच्या सीताफळामध्ये किडे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सीताफळाचे दर हे घसरले असून सध्या मार्केटमध्ये सीताफळ हे 10 ते 30 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत.

सीताफळाच्या पिकाला पिकवण्यासाठी पाणी कमी प्रमाणात वापरले जाते. मात्र, परतीच्या पावसाने सीताफळाच्या पिकाला चांगलंच झोडपून काढलं आहे. योग्य वेळी योग्य ती काळजी न घेत पिकांवर कीटकनाशकांची फवारणी काहीजण करत नाहीत. परिणामी फळांमध्ये काही काळाने किडे पडण्यास सुरुवात होते. महत्वाचे म्हणजे गोल्डन सीताफळामध्ये किडे पाडण्याचे प्रकार जास्त आहेत असे एपीएमसीमधील फळ व्यापारी नितीन चस्कर यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या –

सावधान! मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, N95 बनावट मास्कच्या कारखान्याचा पर्दाफाश

US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

(total 350 vehicles arrived at the Mumbai APMC Fruit Market today)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.