ताडोबा व्याघ्र सफारीसाठी निघालेल्या पर्यटकांची गाडी नाल्यात कोसळली, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जण गंभीर

सना अग्रवाल असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. (Tourist Vehicle accident near Tadoba Andhari Tiger Reserve sanctuary)

ताडोबा व्याघ्र सफारीसाठी निघालेल्या पर्यटकांची गाडी नाल्यात कोसळली, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जण गंभीर
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 3:28 PM

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सना अग्रवाल असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. (Tourist Vehicle accident near Tadoba Andhari Tiger Reserve sanctuary)

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10.30 च्या सुमारास चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वाराकडून एक वाहन पर्यटकांना घेऊन ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येत होती. त्यावेळी मासळ गावाजवळ भडगा नाल्यात या पर्यटकांचे वाहन कोसळले. यामुळे गाडीतील सर्वच प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.

यात अपघातात एका 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना आसपासच्या नागरिकांनी रुग्णालयात रवाना केले आहे.

तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत तपासकार्य सुरु केले आहेत. दरम्यान अपघातग्रस्त झालेले वाहन हे नागपूर येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान कोरोनाच्या भीतीमुळे बंद ठेवण्यात आलेले ताडोबा व्याघ्र प्रकल्प तब्बल सहा महिन्यानंतर खुलं करण्यात आलं आहे.  मात्र, कोव्हिडचा शिरकाव रोखण्यासाठी व्यवस्थापनाने काही अटी-शर्ती पर्यटकांसाठी बंधनकारक केल्या आहेत. ज्यामध्ये एका जिप्सीमध्ये आता 6 ऐवजी 4 पर्यटक बसवणे, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना पर्यटनासाठी बंदी आणि मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक करणे इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.  (Tourist Vehicle accident near Tadoba Andhari Tiger Reserve sanctuary)

संबंधित बातम्या : 

व्याघ्र प्रेमींसाठी खुशखबर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले

मंदिरात तोकडे कपडे नको, भारतीय पेहरावात दर्शनासाठी या, साईबाबा संस्थानचे आवाहन

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.