AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेकिंग करताय तर सावधान! या 3 तरुणांसोबत घडला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

दैव बलवत्तर म्हणून त्यांना तात्काळ अग्निशमन दल, पोलीस दल, गिर्यारोहक यांची मदत मिळाली आणि त्यांची सुखरूप सुटका झाली.

ट्रेकिंग करताय तर सावधान! या 3 तरुणांसोबत घडला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग
| Edited By: | Updated on: Nov 25, 2020 | 5:39 PM
Share

नाशिक : तुम्हीदेखील ट्रेकिंग (tracking) करण्यासाठी जात असाल तर सावधान. कारण आज एक असा धक्कादायक प्रकार समोर आला ज्याने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली. ही घटना नाशिकमध्ये (Nashik) समोर आली आहे. शहरालगत असलेल्या पांडवलेणी डोंगरावर (pandavleni hills) ट्रेकिंग करणं तीन मित्रांच्या जीवावर बेतलं असतं. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांना तात्काळ अग्निशमन दल, पोलीस दल, गिर्यारोहक यांची मदत मिळाली आणि त्यांची सुखरूप सुटका झाली. (tracking on pandavleni hills three friends rescued by fire brigade police and climbers in nashik)

आयुष, सुमित, समर्थ हे तीन शालेय विद्यार्थी सकाळच्या सुमारास पांडवलेणी परिसरातील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. डोंगर चढत असताना त्यांना काही त्रास जाणवला नाही. ते अगदी सहज डोंगर पार करून गेले. मात्र, वरती गेल्यानंतर उन्हाचा तडाका वाढला असता त्यांना चटके बसू लागले. त्यातच खाली उतरताना त्यांना चक्करही आली आणि तिघेही दगड झुडपांमध्ये अडकून पडले.

अशात तिघांनीही आरडाओरड सुरू केली. हे खाली ट्रेकिंग करत असलेल्या काही नागरिकांच्या लक्षात आलं. मुलं वरती अडकून पडल्याचं लक्षात येताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दल कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीला गिर्यारोहक टीमही दाखल झाली. यानंतर मोठं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. परिसरात झाडंझुडपं जास्त असल्याने पथकाला रेस्क्यू करण्यास अडचणी येत होत्या. याचवेळी टीव्ही 9 मराठीची टीम ही घटनास्थळी दाखल झाली. (tracking on pandavleni hills three friends rescued by fire brigade police and climbers in nashik)

तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तीनही मुलांना सुखरूप वाचवण्यात रेस्क्यू पथकाला यश आलं. मात्र, पांडवलेणी परिसरात या अगोदर ही अनेक घटना घडल्या आहेत. परंतु ट्रेकिंग करतानाचे नियम कोणीही पाळत नाही आणि त्यामुळेच अशा घटनेला सामोरं जावं लागतं.

यामुळे नाशिककरांनो ट्रेकिंग करताना सावधानता बाळगा. ट्रेकिंग करताना आपल्याकडे पुरेस इक्युपमेंट्स आहेत का? याची खात्री करा. शक्यतो डोंगरावर, उंच कडे कपारीवर ट्रेकिंग करू नका, अन्यथा ट्रेकिंग करणं आपल्या जीवावर बेतू शकतं. आज याच मुलांचा ओरडण्याचा आवाज जर कोणाच्या कानी पडला नसता तर या शालेय विद्यार्थ्यांना नाहक आपला जीव गमवावा लागला असता.

इतर बातम्या – 

दारुची 14 दुकानं सील तरीही नाशिकच्या लिकर किंगला अटक नाही; एक्साईज विभागाच्या भूमिकेवरुन उलटसुलट चर्चा

Chhagan Bhujbal | नाशिकमधल्या शाळा 4 जानेवारीपर्यत बंदच, डिसेंबरमध्ये पुन्हा आढावा घेऊ : छगन भुजबळ

(tracking on pandavleni hills three friends rescued by fire brigade police and climbers in nashik)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.