क्या बात है… दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का?

लॉकडाऊनच्या काळात शहरांतील मजुरांचे तांडे रोजगार नसल्याने आपल्या गावी निघाले होते. | migrant woman Durga

क्या बात है... दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का?

कोलकाता: देशभरात आजपासून नवरात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोलकात्यामधील नवरात्रौत्सव हा नेहमीच विशेष आकर्षणाचा विषय असतो. कोलकात्यात अनेक ठिकाणी मंडपांमध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या मंडपांमध्ये करण्यात येणारी सजावटही पाहण्यासारखी असते. (Kolkata replaces traditional Durga idol with that of a migrant woman with her children)

यंदादेखील दुर्गेच्या एका मूर्तीमुळे कोलकात्यामधील नवरात्रौत्सव चर्चेचा विषय ठरत आहे. बेहला येथील बरिशा क्लबने यंदा दुर्गेच्या अनोख्या रुपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आपल्या मुलांना कडेवर घेऊन जाणारी स्थलांतरित महिलेच्या रुपातील ही दुर्गा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

रिंतू दास यांनी ही मूर्ती साकारली आहे. कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावरुन जाणारे स्थलांतरित महिलांचे तांडे पाहून आपल्याला ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. कोणाच्याही मदतीशिवाय मुलांना घेऊन रस्त्यावरुन चालणाऱ्या या महिलांमध्ये मला दुर्गा दिसल्याचे दास यांनी म्हटले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. यानंतर शहरांतील मजुरांचे तांडे रोजगार नसल्याने आपल्या गावी निघाले होते. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची सर्व साधने बंद असल्याने लाखो मजुरांना आपल्या गावापर्यंत पायी चालत जावे लागले होते. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला होता. रस्त्यावरुन कोणत्याही मदतीशिवाय चालत गेलेल्या या मजुरांच्या कुटुंबीयांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

कोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना झाली. श्री पूजक शेखर मुनींश्वर आणि स्मिता मुनींश्वर यांच्या हस्ते सर्व विधी पार पडले. अंबाबाईच्या मंदिरातील नवरात्रौत्सव इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिर बंद असले तरी बाहेरून भाविक देवीच्या दर्शनासाठी धडपड करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या:

मजूर चालून चालून थकले, भुकेने वाट रोखली, जळगावात उपासमारीने दोघांचा मृत्यू, एकाची पू्र्णा नदीत उडी

प्रवासी मजुरांच्या प्रश्नावरुन सुप्रीम कोर्टात खडाजंगी, तिकिटाच्या पैशावरुन युक्तीवाद

ड्रामेबाजी करण्यापेक्षा मजुरांच्या सूटकेस धरा, सीतारामन राहुल गांधींवर भडकल्या, सोनियांना हात जोडून विनंती

(Kolkata replaces traditional Durga idol with that of a migrant woman with her children)

Published On - 9:07 am, Sat, 17 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI