AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी बजेटमध्ये करा परदेश वारी, ‘हे’ आहेत जगभरातील अधिक सुंदर देश

तुमचेही स्वप्न परदेशात फिरायला जाण्याचे असेल पण बजेटमुळे तुमचे प्लॅन रद्द करावे लागले असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात आपण जगभरातील काही बजेट-फ्रेंडली देशांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत भेट देता येते.

कमी बजेटमध्ये  करा परदेश वारी, 'हे' आहेत जगभरातील अधिक सुंदर देश
| Edited By: | Updated on: Sep 29, 2025 | 10:41 PM
Share

आपल्यापैकी अनेकांना फिरायला जाण्याची एखादे ठिकाणं एक्सप्लोर करायची खूप आवड असते. प्रवास म्हटंल की आयुष्यात एकदा तरी परदेशात जावेसे वाटते. कारण प्रवास केल्याने तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आणि पाहण्याची संधी मिळते, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर देखील होतो.

प्रवास प्रेमी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरण्याची आकांक्षा बाळगतात. परंतु आपल्या या स्वप्नांच्या मार्गात अनेक अडचणी येतात. त्यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे बजेट. बजेटच्या कमतरतेमुळे हे स्वप्न अनेकदा अयशस्वी होते. पण आता चिंता करायची गरज नाही कारण जगात असे काही देश आहेत जे परवडणारे आहेत आणि एक अद्भुत अनुभव देतात. त्यांना भेट देण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची आवश्यकता नाही. या लेखात आपण काही देशांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता.

थायलंडला फिरायला जाण्याचा करा प्लॅन

थायलंड हे एक सुंदर देश आहे. त्यात थायलंडला भेट देण्याची क्रेझ लक्षणीयरीत्या वाढली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हा देश एकदम बजेट-फ्रेंडली आहे. येथील नाईटलाइफ, मंदिरे आणि स्ट्रीट फूडपासून ते सर्व काही एक अनोखा अनुभव देते. तुम्ही थायलंडमधील पटाया, फुकेत आणि बँकॉक सारख्या ठिकाणी भेट देऊ शकता. तीन दिवसांचा प्रवास 1 लाखापेक्षा कमी किमतीत करता येतो. दिल्लीहून विमान तिकिटाची किंमत सुमारे 18,000 ते 22,000 असेल. तुम्ही थायलंडमध्ये 3-स्टार हॉटेल किंवा हॉस्टेलमध्ये राहू शकता, ज्याची किंमत 3,000 रूपये पर्यंत असू शकते. तर थायलंड मधील स्ट्रीट फूड देखील परवडणारे आहे. मात्र बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला तुमची फ्लाइट आणि हॉटेल ट्रिपला जाण्याआधीच बुक करावे लागेल.

व्हिएतनाम देखील एक चांगला पर्याय आहे

व्हिएतनाम त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी, हाँग बे आणि हो ती मिन्ह सिटीसाठी ओळखले जाते. तुम्हाला या देशाची संस्कृती आवडेल. येथे पाहण्यासारखे बरेच काही आहे. व्हिएतनामचे समुद्रकिनारे खूप लोकप्रिय आहेत, ज्यात माय खे बीच, फु क्वोक आणि न्हा ट्रांग यांचा समावेश आहे. येथे तुम्हाला वाघ आणि आशियाई हत्तीसारखे दुर्मिळ प्राणी देखील पाहायला मिळतील. हा देश खूपच बजेट फ्रेंडली आहे. दिल्ली ते व्हिएतनामचा राउंड ट्रिप 16,000ते 40,000 रुपयांपर्यंत असू शकतो. दररोज जेवण आणि प्रवास अंदाजे 4,000 रुपयांमध्ये पूर्ण करता येतो. राहण्यासाठी अनेक परवडणारी हॉटेल्स आणि वसतिगृहे उपलब्ध आहेत.

मलेशिया देखील बजेट फ्रेंडली आहे

मलेशिया हा देश त्यांच्या बहुसांस्कृतिक वारसा आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो. येथे तुम्हाला मलय, चिनी, भारतीय आणि स्थानिक संस्कृतींचे मिश्रण बघायला मिळेल. तर मलेशियाला जाण्यासाठी विमान तिकिटे 20,000ते 25,000 रुपयांना मिळू शकतात. राहण्यासाठी 2,000-2500 रुपये आणि खाण्यापिण्यासाठी रोजचे 1,000 रुपये खर्च येईल. स्थानिक वाहतुकीने प्रवास करून तुम्ही आणखी पैसे वाचवू शकता.

श्रीलंकेचे सौंदर्य एक्सप्लोर करा

श्रीलंका हा भारताचा शेजारी देश आहे. तुम्ही येथे बजेटमध्ये प्रवास करू शकता. श्रीलंकेत पाहण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. जेवण, राहण्याची व्यवस्था आणि पर्यटन स्थळे पाहणे हे सर्व तुमच्या बजेटमध्ये असेल. श्रीलंकेला जाण्यासाठी राउंड-ट्रिप तिकिटाची किंमत 15,000 ते 20,000 रुपये आहे. राहण्यासाठी हॉटेल्स रूम 2,000 ते 2500 रुपयांना मिळू शकतात आणि 20,000 ते 25,000 रूपयांत प्रेक्षणीय स्थळे पाहाता येतील. येथे ऐतिहासिक मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव सफारी आणि बरेच काही पाहण्यासारखे आहे.

कमी बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी स्मार्ट टिप्स

आगाऊ बुकिंग: कुठेही जाण्यापूर्वी तुमची फ्लाइट आणि हॉटेल 2-3 महिने आधीच बुक करा.

ऑफ-सीझन निवडा: ऑफ-सीझनमध्ये तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करा. कारण यामुळे तुम्हाला निम्म्या किमतीत फ्लाइट आणि हॉटेल्स मिळण्यास मदत होऊ शकते.

हॉस्टेलमध्ये राहा: हॉटेलऐवजी हॉस्टेलमध्ये राहा. ते सहसा स्वस्त असतात..

स्थानिक वाहतुकीचा वापर करा: जर तुम्ही कोणत्याही देशात गेलात तर खाजगी टॅक्सीऐवजी स्थानिक वाहतुकीने प्रवास करा.

प्रवास विमा: प्रवास विमा घेतल्याने तुमचा प्रवास सुरक्षित होईल.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!