कापसाने भरलेला ट्रक पैनगंगा नदीत कोसळला, एक ठार, 2 जण बेपत्ता

कापसाने भरलेला ट्रक पुलावरून पैनगंगा नदीत कोसळल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे.

कापसाने भरलेला ट्रक पैनगंगा नदीत कोसळला, एक ठार, 2 जण बेपत्ता

नांदेड : कापसाने भरलेला ट्रक पुलावरून पैनगंगा नदीत कोसळल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. हदगाव जवळच्या मार्लेगावानजिकच्या पुलावरून हा ट्रक नदीपात्रात पडला आहे. या घटनेत आतापर्यंत एकाचा मृतदेह सापडला असून ट्रक चालकासह अन्य एक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. (Truck full of cotton crashed into the Painganga River, one dead, two missing)

आज पहाटेच्या सुमारास या पुलावरुन जात असताना ट्रकचा उजव्या बाजूचे टायर फुटल्याने हा ट्रक कोसळल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. कंधार येथील कापसाच्या व्यापाऱ्याचा हा ट्रक नागपूरकडे जात असताना ही दुर्घटना घडली आहे.

साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू

कराड तालुक्यातील पाटण ढेबेवाडी येथे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात (chicken tempo accident) झाल्याची घटना शनिवारी (2 जानेवारी) घडली आहे. या अपघातात तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. चालकाला कोणतीही इजा झालेली नाही. मात्र, अपघातात तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

कराड तालुक्यात कराड -ढेबेवाडी रस्त्यावर टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती. कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील काढणे फाट्याजवळ हा टेम्पो आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात उलटला. त्यामुळे टेम्पोत असलेल्या जवळपास 600 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.

या अपघातात चालकाला कोणतीही इजा झाली नाही. घटनेची माहिती होताच शेतातील शेतकरी आणि इतर प्रवासी यांनी तत्काळ मदतकार्य केले. मात्र तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे मालकाचे लाखो रुपयांचे नुसकान झाल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

कोंबड्यांचा ट्रक उलटला, पळवापळवीसाठी नागरिकांची झुंबड, 300 कोंबड्यांची लूट

रत्नागिरीत भीषण अपघात; खासगी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

सांताक्रुझमध्ये रिक्षाचा अपघात, रिक्षाचालक थोडक्यात बचावला

(Truck full of cotton crashed into the Painganga River, one dead, two missing)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI