AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साई संस्थानला तृप्ती देसाईंकडून अल्टिमेटम, 31 डिसेंबरपर्यंत बोर्ड काढा; अन्यथा… 

साई संस्थानने 31 डिसेंबरपर्यंत तो बोर्ड हटवावा, अन्यथा शिर्डीमध्ये येऊ, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. (Trupti Desai Sai Sansthan)

साई संस्थानला तृप्ती देसाईंकडून अल्टिमेटम, 31 डिसेंबरपर्यंत बोर्ड काढा; अन्यथा... 
| Updated on: Dec 10, 2020 | 6:12 PM
Share

अहमदनगर : साई संस्थानने 31 डिसेंबरपर्यंत ड्रेस कोडबाबतचा बोर्ड हटवावा, अन्यथा पुन्हा एकदा शिर्डीमध्ये येऊ, असा अल्टिमेटम भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला दिला. शिर्डीमध्ये जात असताना तृप्ती देसाई यांना पोलिसांनी अहमदनगरच्या हद्दीवर ताब्यात घेतले. तब्बल चार तासांनंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यानंतर देसाई यांनी साई संस्थानला हा इशारा दिला.  (Trupti Desai stopped by police, Desai appeal to Sai Sansthan to remove board until December 31)

अहमदनगरच्या सीमेवर तृप्ती देसाई यांना रोखलं

शिर्डीतील साईबाबा मंदिर प्रशासनाने भक्तांनी भारतीय पेहरावात यावे, तोकडे कपडे घालू नये; असे आवाहन केले आहे. तशा आशयाचा बोर्डही साई संस्थानने साईबाबा मंदिर परिसरात लावला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हा बोर्ड हटवण्याची मागणी साई संस्थानकडे केली होती. मात्र, संस्थानने तो बोर्ड न हटवल्यामुळे देसाई गुरुवारी ( 10  डिसेंबर) पुण्याहून शिर्डीकडे रवाना झाल्या होत्या. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच तृप्ती देसाई यांच्या जीवितास धोका असल्याचे कारण देत, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

31 डिसेंबरपर्यंत फलक काढा, अन्यथा पुन्हा शिर्डीत येऊ

तृप्ती देसाई शिर्डीकडे रवाना झाल्यानंतर त्यांना अहमदनगरच्या सीमेवर रोखण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तब्बल चार तासांनंंतर पोलिसांनी  त्यांची मुक्त्तता केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, “साई संंस्थानला आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो आहोत. संस्थानने तो बोर्ड 31 डिसेंबरपर्यंत हटवावा. अन्यथा आम्हाला पुन्हा शिर्डीत यावं लागेल. तिथे येऊन तो बोर्ड हटवावा लागेल,” असे तृप्ती देसाई म्हणाल्या. (Trupti Desai stopped by police, Desai appeal to Sai Sansthan to remove board until December 31)

…तर साई संस्थानला तालिबानी पुरस्कार देऊ

यावेळी बोलताना, त्यानी संस्थानच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “साई संस्थानची भूमिका अयोग्य आहे. साई संस्थान सांगतं की, कपड्यांबाबत आम्ही आवाहन केले आहे. मात्र, हे आवाहन नाही, तर तो फतवा आहे. फतवा फक्त तालिबानमध्ये काढला जातो. म्हणून संस्थानने 31 डिसेंबरपर्यंत बोर्ड काडला नाही, तर आम्ही भूमाता ब्रिगेडतर्फे साई संस्थानला तालिबानी पुरस्कार देऊन त्यांचा निषेध करु,” असा इशार तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला दिला.

शिर्डीत जल्लोष करणाऱ्या 40 जणांविरोधात गुन्हा

दरम्यान, तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यांनतर शिर्डीमध्ये जल्लोष केल्यामुळे 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला. ब्राम्हण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, शिवसेनेच्या स्वाती परदेशी, भाजपच्या नगरसेविका वंदना गोंदकर यांच्यासह इतर 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधानातील कलम 188, 269, साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती अधिनियम कायद्यान्वये पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या :

तृप्ती देसाईंना पोलिसांची नोटीस, साई मंदिरातील ‘तो’ फलक काढण्याचा इशारा दिल्याने शिर्डीत नो एन्ट्री

‘शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच’, तृप्ती देसाईंचा निर्धार, तगडा पोलिस बंदोबस्त

(Trupti Desai stopped by police, Desai appeal to Sai Sansthan to remove board until December 31)

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.