प्रजासत्ताक दिनी तीन ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनी तीन ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई: देशासह संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात तीन ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबईत मंत्रालयासमोर आश्रम शाळेच्या दोन शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिकडे पालघरमध्ये शेतकऱ्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच साताऱ्यात एका महिलेने गाव गुंडाना वैतागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

पालघरमध्ये शेतकरी आक्रमक

बडोदा द्रुतगती महामार्गाविरोधात पालघरमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नागझरी येथे काल पोलीस संरक्षणात मुंबई-बडोदा एक्स्प्रेसचा सर्व्हे सुरु असल्याने, शेतकरी कमलाकर यांनी विष प्रशान करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना रोखलं. या महामर्गामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी जात असल्याने, सध्या पालघरमीधल शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. जीव गेला तरी आम्ही आमच्या जमिनी महामार्गासाठी देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सरकार भूसंपादनासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

साताऱ्यात गावगुंडाना वैतागून आत्मदहनाचा प्रयत्न

साताऱ्यातील जांब येथे एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वारंवार गावातील एक व्यक्ती त्रास देत आहेत, मात्र पोलीस दखल घेत नसल्याने, या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

यासोबतच मुंबईतही मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना अनुदान मिळत नसल्यामुळे, दोन शिक्षकांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी 20 शिक्षकांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं, त्यापैकी दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI