नावाला धर्मप्रचारक पण करायचा मुलींचे लैंगिक शोषण, कोर्टाने दिली तब्बल 1000 वर्षांची शिक्षा

धार्मिक प्रचाराच्या नावाखाली लैंगिक शोषण, फसवणूक आणि आणि गुन्हेगारी टोळी करण्याच्या गुन्ह्याखाली तुर्कस्तानमधील एका इस्लामी टीव्ही प्रचारक आणि लेखकाला तब्बल 1075 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (Turkey court Adnan Oktar)

नावाला धर्मप्रचारक पण करायचा मुलींचे लैंगिक शोषण, कोर्टाने दिली तब्बल 1000 वर्षांची शिक्षा
prajwal dhage

|

Jan 12, 2021 | 12:38 PM

अंकारा : धार्मिक प्रचाराच्या नावाखाली लैंगिक शोषण, फसवणूक आणि गुन्हेगारी टोळी निर्माण करणाऱ्या एका इस्लामी टीव्ही प्रचारक आणि लेखकाला तब्बल 1075 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा धर्मप्रचारक मूळचा तुर्कस्तान देशातील आहे. तुर्कस्तान येथील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याविरोधात लैंगिक शोषण, फसवणूक तसेच इतरही अनेक गुन्हे नोंदवण्यात आले असून अदनान ओक्तार असे त्याचे नाव आहे. (Turkey court sentences 1000 year jail to tv preacher Adnan Oktar under different crime)

मिळालेल्या माहितीनुसार ओक्तार याचे यापूर्वी स्व:तचे एक टीव्ही चॅनेल होते. या चॅनलवर तो इस्लामिक विषयांवर वेगवेगळे टॉक शो होस्ट करायचा. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मोक्तारने एकदा अर्धनग्न मुलींसोबत डान्स केला होता. त्या डान्सचेसुद्धा त्याने आपल्या चॅनेलवर प्रसारण केले होते.

मुलींचे ब्रेनवॉश करायचा

इस्तानबूल पोलिसांनी ओक्तारला 2018 च्या जुलैमध्ये अटक केली होती. यावेळी पोलिसांनी ओक्तारसोबत अन्य 77 जणांनासुद्धा ताब्यात घेतलं होतं. त्यांनतरच्या चौकशीमध्ये ओक्तारने मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले आहेत. तो या मुलींना ‘किटन’ म्हणून संबोधित असे. तर मुलांना तो ‘लॉयन’ म्हणायचा. असं म्हटलं जातं की, तो या मुलींचे ब्रेन वॉश करायचा.

तुर्कस्तानचे शासकीय माध्यम अनादोलूने दिलेल्या माहितीनुसार ओक्तार आणि त्याच्यासोबतच्या 13 अट्टल गुन्हेगारांना एकूण 9803 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एकट्या ओक्तारला 10 आरोपांखाली तब्बल 1075 वर्षे आणि 3 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

दरम्यान, ओक्तारने 70 च्या दशकात आपल्या अनुयायांना जमवण्यास सुरुवात केली होती. तुर्कस्तानमधील न्यायालयाने सुनावेल्या या शिक्षा एकसारख्या चालत राहतील. असे असले तरी त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. तसेच, लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे.

संबंधित बातम्या :

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी मैत्री राखली, जाता-जाता पाकिस्तानसह तुर्कीला मोठा झटका!

तुर्कीत शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

तुर्कस्तानचा 100 टन आयात कांदा पिंपळगाव बसवंत इथं दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

(Turkey court sentences 1000 year jail to tv preacher Adnan Oktar under different crime)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें