TV9 Bangla : टीव्ही 9 बांगला लाँच, देशातील नंबर 1 नेटवर्कचं आणखी एक पाऊल

टीव्ही 9 बांगला (TV9bangla Launched) आजपासून प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झालं आहे. टीव्ही9 हे भारतातील नंबर 1 वृत्तवाहिन्यांचं नेटवर्क आहे.

TV9 Bangla : टीव्ही 9 बांगला लाँच, देशातील नंबर 1 नेटवर्कचं आणखी एक पाऊल

नमस्कार, मकर सक्रांतीच्या मुहूर्तावर टीव्ही 9 नेटवर्कच्या समुहात आणखी एका वृत्तवाहिनीची भर पडली आहे. टीव्ही 9 बांगला (TV9bangla Launched) आजपासून प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झालं आहे. टीव्ही9 हे भारतातील नंबर 1 वृत्तवाहिन्यांचं नेटवर्क आहे. टीव्ही 9 बांगलाच्या लॉन्चनंतर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, आम्ही बंगालच्या 10 कोटी जनतेचं आवाज म्हणून काम करु. टीव्ही 9 नेटवर्कच्या इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणंच टीव्ही 9 बांगलातही निष्पक्ष पत्रकारितेलाच महत्त्व देऊ. कुठल्याही दबावाशिवाय, कुठल्याही व्यक्ती वा संस्थेच्या प्रभावाखाली न येता आम्ही सत्य बातम्यांना महत्त्व देऊ.(Tv9 Network Launches Its New Channel in Bengali TV9bangla )

टीव्ही 9 बांगलामध्ये माध्यम क्षेत्रातील अनुभवी लोक आहे. हायटेक स्टुडीओसह पश्चिम बंगालच्या सर्व 23 जिल्ह्यांमध्ये रिपोर्टरची फौज आम्ही उभी केली आहे. थेट जमिनीवरची लाईव्ह परिस्थिती तुम्हाला टीव्ही 9 बांगलावर पाहता येणार आहे. बंगाल ही महापुरुषांची भूमी आहे. ज्यांनी देशाला कायम एक नवी दिशा दाखवली.

बंगालमध्ये आम्ही नव्या क्रांतीची मशाल घेऊन वाटचाल करत आहोत. आम्ही विश्वासानं सांगतो की टीव्ही 9 नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा निष्पक्ष पत्रकारितेला रुजवणार आहे. निर्भिड पत्रकारिता ही बंगालची आधीपासूनची ओळख आहे. आणि तेच दिवस पुन्हा एकदा आम्ही बंगालमध्ये आणण्याची ताकद ठेवतो. टीव्ही 9 बांगला असं व्यासपीठ असेल जिथं फक्त सामान्यांना अधिक महत्त्व दिलं जाईल.

आम्हाला विश्वास आहे, तुम्ही टीव्ही 9 बांगलाला तेवढंच प्रेम द्याल, जेवढं तुम्ही आमच्या इतर वृत्तवाहिन्यांना आतापर्यंत देत आले आहात. तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही पुरेपुर प्रयत्न करु. तर चला सुरु करुया बातम्यांच्या दुनियेची नवी सफर,टीव्ही 9 बांगलासोबत!

 

(Tv9 Network Launches Its New Channel in Bengali TV9bangla )

Published On - 11:35 am, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI