राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही, उदय सामंतांचा टोला

राज्यात तातडीने कॉलेज सुरु करण्यासारखी परिस्थिती नाही, असेही उदय सामंतांनी स्पष्ट केलं. (Library May Reopen soon Said Uday Samant)  

राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही, उदय सामंतांचा टोला
. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Namrata Patil

|

Oct 09, 2020 | 1:39 PM

मुंबई : राज्यातील ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय तत्त्वता आठ दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे. ही ग्रंथालय सुरू करतानाचे नियम येत्या दोन चार दिवसात तयार होईल. त्यानंतर राज्यातील ग्रंथालये सुरू होतील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. कोल्हापुरात अंतिम वर्षांच्या परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. (Library May Reopen soon Said Uday Samant)

ग्रंथालय सुरु करण्यासाठी कोणी कोणाला फोनाफोनी केली म्हणून ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असा टोलाही उदय सामंतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला.

कोल्हापुरातून अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी एकूण 74 हजार 11 विद्यार्थी परीक्षेला बसले आहे. त्यातील 50 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर 13 हजार विद्यार्थी ऑफलाईनद्वारे परीक्षा देणार आहे. कोल्हापुरात 293 सेंटरवर ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच जर परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली तर त्याला नंतर परीक्षा देता येईल, अशी सोय करण्यात आली आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

“तातडीने कॉलेज सुरु करण्यासारखी परिस्थिती नाही”

मुंबई विद्यापीठात अडचणी आल्या तशा तक्रारी येऊ देऊ नका अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाची परीक्षेची तयारी झालेली आहे. पालकमंत्री सतेज पाटील परीक्षा सुरू होण्याआधी आढावा घेणार आहे. दरम्यान सध्या तरी राज्यात तातडीने कॉलेज सुरु करण्यासारखी परिस्थिती नाही, असेही उदय सामंतांनी स्पष्ट केलं.

मुंबई विद्यापीठात तीन दिवसांपूर्वी आयडॉलच्या परीक्षेवेळी गोंधळ निर्माण झाला होता. त्या दोन दिवसात 9 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. मुंबई विद्यापीठाची 100 टक्के सिस्टीम डॅमेज करण्यासाठी सायबर हल्ला झाला आहे. पोलिसात तक्रार दिली आहे. चेन्नईच्या कंपनीला ऑडीटच्या सूचना दिल्या आहेत.

सीमा भागातील महाविद्यालयाचा आढाव घेतला आहे. सीमा भागात जानेवारी महिन्यापासून अभ्यासक्रम सुरू होणार आहे. शिनोळे इथं नवीन संकुल होणार आहे.  (Library May Reopen soon Said Uday Samant)

संबंधित बातम्या : 

मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, परीक्षा मंडळाकडून घोषणा

2 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, परीक्षेला बसू न शकणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ: मुंबई विद्यापीठ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें