AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…त्यांना तर हाज ठाकरे म्हणायचे, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना डिवचले

उद्धव ठाकरे यांची महास्फोटक मुलाखत टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी आज घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर आणि सध्या राजकारणावर जोरदार भाष्य केले आहे.

...त्यांना तर हाज ठाकरे म्हणायचे, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना डिवचले
| Updated on: Nov 12, 2024 | 6:05 PM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी उडाली आहे. या रणधुमाळीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. लोकसभेत मुस्लीमांचे मते मिळाल्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद झाल्याचा आरोप केला आहे. या सर्व विषयांवर उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणे उत्तरे दिली आहेत.यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे यांची महास्फोटक मुलाखत टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात कोरोना काळात कुणाचा उपचाराविना मृत्यू झाला नाही. त्यांची काळजी घेतली गेली. आम्ही मृत्यूचा आकडा लपवला नाही. उलट परप्रांतीय त्यांच्या राज्यात गेले तेव्हा महाराष्ट्र बरा असं ते म्हणत होते. आम्ही छावण्या केल्या होत्या. तीन वेळा अन्न दिलं होते. मजूरांची नीट काळजी घेतली होती असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तुमच्या पक्षातून सर्व मुसलमान काढून टाका..

उद्धव ठाकरे यांच्यावर मुस्लीमांची बाजू घेत असल्याचा आरोप होतो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कॅलेंडरमध्ये त्यांच्या नावा पुढे जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. यावर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांचे मशिदीतील फोटो दाखवू का? टोप्या घालून घास भरवणारे फोटो दाखवू. मोहन भागवत जामा मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू?. मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू?. तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नको. तुमच्या पक्षातून सर्व मुसलमान काढून टाका मग. माझं जाहीर आव्हान आहे. त्यांच्याकडे कोणी मंत्री वगैरे असतील त्यांना काढा. हिंमत असेल तर जाहीर करा. या देशात मुस्लिम राहता कामा नये हे जाहीर करा असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

तेव्हा राज ठाकरेंना हाज ठाकरे म्हणत होते

उद्धव ठाकरे म्हणाले की राज ठाकरे यांच्या मनसेने मुस्लीमांना हज सवलत देण्याची मागणी केली होती. तेव्हा राज ठाकरेंना हाज ठाकरे म्हणत होते. हाजला जाण्यासाठी सुविधा देण्याचं ते म्हणाले होते. त्यांनी टोपी घातली होती. आता ते दुसऱ्यांना टोप्या घालत आहेत असेही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत सांगितले. या देशातील सर्व मुसलमान गुन्हेगार आहेत, असं बाळासाहेब म्हणाल्याचं एक तरी वाक्य दाखवा असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मोदींनी नवाज शरीफचा केक खाल्ला तर…

नवाब मलिकांबाबतची भूमिका भाजपाने जाहीर करावी. अजितदादांनी नवाब मलिकांना त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. हे काय आहे.? का कारवाई करत नाही. मोदींनी नवाज शरीफचा केक खाल्ला तर त्यांना पक्षातून का काढून टाकलं नाही?. त्यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा का नाही घेतला?. देशाच्या दुश्मनाचा केक खाल्ला म्हणून त्यांना पक्षातून काढलं का नाही? बाळासाहेब गेल्यावर अमित शाह म्हणाले. मै उद्धव जी से सल्लामसलत करतो. आता म्हणतात उद्धव ठाकरे नकली संतान आहे असे यांचा दुटप्पी धोरण असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.