Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?

मुख्यमंत्र्यांनी आणखी 16 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर करतानाच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं (Uddhav Thackeray on Lockdown extension in Maharashtra).

Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 6:09 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतरही 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु राहिल, असं जाहीर केलं (Uddhav Thackeray on Lockdown extension in Maharashtra). मुख्यमंत्र्यांनी आणखी 16 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर करतानाच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच या काळात कोणत्या गोष्टींना सूट असेल याबाबतही माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “लॉकडाऊन जरी कायम ठेवला तरी आपल्याला आता एकूण परिस्थितीचं गांभीर्य कळालं आहे. काय करायला हवं ते लक्षात आलं आहे. आपण आजपर्यंत लॉकडाऊनमध्ये देखील शेतीच्या कामावर आपण कुठलेही निर्बंध आणलेले नाहीत. शेतीविषयीची जी कामं आहेत ती चालू आहेत. शेतीतील माल, अवजारं असतील, बी बियाणं असेल, खत असेल काहीही असेल त्याला कुठंही आपण बंद केलेलं नाही. यापुढीही करणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहिल. पण 14 एप्रिलनंतर कुठंही मला गोंधळ नको आहे. माझ्या महाराष्ट्राने छान धैर्य दाखवलं आहे, हिंमत दाखवली आहे.”

विद्यापीठाच्या परीक्षा आल्या आहेत, शाळांच्या परीक्षा आल्या आहेत. त्यावर काम सुरु आहे. उद्योगधंद्यांबाबत देखील काम सुरु आहे. उद्योगधंदे सुरु होणार की नाही, झाले तर नेमके कोणते होणार, कधी होणार, मजूर काय करणार, या सर्वांची उत्तरं मी तुम्हाला 14 एप्रिलपर्यंत देणार आहे. कारण त्यावर आपलं काम सुरु आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आत्ता असं अचानक तुमच्यासमोर येण्याचं माझ्या मनात काही नव्हतं. पण एकूणच उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मीच तुमचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला हे सांगणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं. म्हणूनच मी आत्ता समोर येऊन ही माहिती दिली, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

“शक्य आहे त्याने वर्क फ्रॉम होम करा”

उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्याला ज्याला वर्क फ्रॉम करणं शक्य आहे त्याने त्याने वर्क फ्रॉम सुरु करा. आपल्याला 14 एप्रिलपासून किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवावा लागणार आहे. किमान या शब्दावर मी मुद्दाम जोर देतो आहे. या काळात काही प्रमाणात निर्बंध करण्याबाबत सूचना दिल्या जातील. हा विचित्र व्हायरस आहे त्यामुळे तुम्ही शिस्त पाळा.”

संबंधित बातम्या : Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन 16 दिवसांनी वाढवला

Maharashtra Extends Lockdown | 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला, मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह प्रसारणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

अमेरिकासुद्धा आपल्याकडे औषध मागतेय, आपण जिंकणारच : उद्धव ठाकरे

‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’

Uddhav Thackeray on Lockdown extension in Maharashtra

Non Stop LIVE Update
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.