महिलांना 500 तर शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा, पैसे काढण्यासाठी ठराविक तारखा

केंद्र शासनामार्फत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या बचत खात्यात 500 रुपये रक्कम जमा (Corona Central Government Fund women farmers)  करण्यात आली आहे.

महिलांना 500 तर शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा, पैसे काढण्यासाठी ठराविक तारखा
या गाईडलाईन्स पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती (Corona Central Government Fund women farmers)  लक्षात घेता केंद्र शासनामार्फत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या बचत खात्यात 500 रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत पुढील तीन महिने ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक महिलेच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी ही रक्कम काढण्यासाठी काही ठराविक तारखा ठरवून देण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक (Corona Central Government Fund women farmers)  असलेल्या महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची आर्थिक रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतंर्गत 2 हजार रुपये ही पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने सर्व बँक शाखा, बँक ग्राहक सेवा केंद्र, बीसी पॉईंट, एटीएम इत्यादी ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी ही रक्कम काढण्याची एक ठराविक तारीख ठरवून दिली आहे. त्यानुसार या बचत खात्यातून त्या दिवशी किंवा 9 एप्रिलनंतर केव्हाही हे पैसे काढता येणार आहे. स्वयंसहायता समुहातील महिला सदस्यांनी व इतर महिलांनी गर्दी न करता आपल्या आवश्यकतेनुसार पैसे काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

खातेधारक महिलेच्या जनधन खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकाप्रमाणे ही रक्कम काढण्यासाठी ठराविक तारखा ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार जर खाते क्रमांकातील शेवटचा अंक 0 ते 1 (3 एप्रिल), 2 ते 3 (4 एप्रिल), 4 ते 5 (7 एप्रिल), 6 ते 7 (8 एप्रिल), 8 ते 9 (9 एप्रिल) अशा या तारखा आहेत. या बचत खात्यातून त्या ठराविक दिवशी किंवा 9 एप्रिलनंतर केव्हाही हे पैसे काढता येणार आहे.

तसेच गरोदर, आजारी, अपंग आणि वृध्द महिलांना थेट घरपोच ही रक्कम दिली जाणार (Corona Central Government Fund women farmers)  आहे.

संबंधित बातम्या : 

Lockdown : 500 किमीची पायपीट, चालून चालून थकलेल्या 23 वर्षीय तरुणाचा निवारागृहात मृत्यू

Corona | मुंबईतील डीसीपी रँक अधिकाऱ्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI