पाकिस्तानी विमानांची घुसखोरी, दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरु

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. सीमेवरील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयात […]

पाकिस्तानी विमानांची घुसखोरी, दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

सीमेवरील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही बैठक सुरु होत आहे. काही वेळापूर्वीच अजित डोभाल गृहमंत्रालयात दाखल झाले आहेत. यामध्ये रॉचे प्रमुख आणि गृह सचिवही उपस्थित असतील.

देशातील विमानतळं आणि शहरांमध्ये हायअलर्ट

खबरदारीचा उपाय म्हणून देशातील काही विमानतळे आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. राजस्थानमधील जैसलमेर हे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं शहर आहे. या शहरातील गावं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय गुजरातमधील पूँछमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पाकिस्तानचं विमान पाडलं

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने वेळीच उत्तर दिलं आणि हा प्रयत्न हाणून पाडला. विशेष म्हणजे भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं सर्वात महत्त्वाचं असलेलं F-16 हे विमान पाडल्याची माहिती आहे. हे विमान पडत असताना पायलट पॅराशूटच्या माध्यमातून उडी फेकत असल्याचंही दिसून आलंय.

पाकिस्तानकडून खळबळजनक दावे

दुसरीकडे पाकिस्तानने अत्यंत गंभीर दावे केले आहेत. यात सर्वात चिंतेचा दावा म्हणजे एका भारतीय पायलटला अटक केल्याचं पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर गफूर यांनी म्हटलंय. भारताचे दोन विमान पाडले, एक काश्मीरमध्ये, तर दुसरं पीओकेमध्ये पाडलं, असा दावा पाकिस्तानने केलाय. आम्ही स्वतःची क्षमता दाखवण्यासाठी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला केला असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.