अटी-शर्ती पाळून अडकलेल्या मजुरांना समन्वयाने राज्यात न्या, केंद्राचा निर्णय

केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थलांतरित मजूर, पर्यटक, विद्यार्थी, यात्रेकरुंना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

अटी-शर्ती पाळून अडकलेल्या मजुरांना समन्वयाने राज्यात न्या, केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : लॉकाडाऊनच्या काळात इतर राज्यांमध्ये (Migrant Labors) अडकलेल्या स्थलांतरित मजूर, पर्यटक, विद्यार्थी, यात्रेकरु यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Home Ministry) दिलासा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थलांतरित मजूर, पर्यटक, विद्यार्थी, यात्रेकरुंना स्थलांतरित करण्याची परवानगी राज्य सरकारांना दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दोन राज्यांच्या परस्पर संमतीने राज्य अडकलेल्या नागरिक, मजूरांचं स्थानांतरण करु शकतात. सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य सुरक्षेचे नियम पाळत बसने प्रवासाला केंद्रीय गृहमंत्रालयाने (Migrant Labors) मंजुरी दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. देशात अचानकपणे लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने अनेक प्रवासी, पर्यटक, विद्यार्थी आणि सर्वाधिक मजूर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले. या लोकांना आता त्यांच्या मूळगावी परत जाता येणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन नियमावली जारी केली आहे.

महाराष्ट्र, बिहार, झारखंडसारख्या काही राज्यांनी अडकलेल्या मजूरांच्या स्थलांतरणाची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाने देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या प्रवासी मजूर, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. या नवीन नियमावलीनुसार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेले लोक (Migrant Labors) आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करु शकतात.

नवीन नियमावलीनुसार, सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना नोडल अधिकारी नियुक्त करावा लागेल आणि अडकलेल्या नागरिकांना परत पाठवण्यासाठी एसओपी तैनात करावी लागेल. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांसाठी राज्यांनी परस्पर चर्चा करणे अपेक्षित आहे. तसेच, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवण्यात येणाऱ्या नागरिकांची आधी तपासणी केली जाईल. तपासणीनंतरच त्या नागरिकांना पाठवण्यात येईल. आपल्या राज्यात पोहोचल्यानंतर या नागरिकांना स्थानिक आरोग्य अधिकारी तपासून क्वारंटाईन करतील. शिवाय, या नागरिकांना आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यासाठी (Migrant Labors) प्रोत्साहित केलं जावं.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशात काय म्हटलंय?

1. लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरित कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले

2. त्यांना काही नियमांतर्गंत आपल्या घरी पाठवण्याची परवानगी देण्यात आली

3. सर्व राज्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, लोकांना पाठवताना किंवा प्रवेश देताना प्रोटोकॉलचं पालन बंधनकार

4. राज्यात अडकलेल्या लोकांची यादी नोडल अधिकाऱ्यांनी तयार करणं गरजेचं

5.  जर एखाद्या ग्रुपला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल तर दोन्ही राज्यांची मंजुरी आवश्यक

6. प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं स्क्रिनिंग केलं जावं, ज्यांच्यामध्ये लक्षण नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी

7. प्रवासासाठी बसचा वापर केला जावा, या बसेसचं निर्जुंतीकरण करणं, तसंच बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक

8 आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर संबंधित लोकांची आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी करावी

9 . तसंच त्यांना होम क्वारंटाइन केलं जावं, गरज असली तर संस्थात्मक क्वारंटाइन केलं जावं

संबंधित बातम्या :

Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?

पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : खासदार हुसेन दलवाई

आयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा

पैशांचा तुटवडा, किडनी आणि लिव्हरचे उपचार परवडेना, राहुल गांधी 1,000 रुग्णांची जबाबदारी घेणार

Published On - 7:25 pm, Wed, 29 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI