रविकांत तुपकरांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

रविकांत तुपकर यांच्या शेतातील सोयाबीन गंजीला आग लावल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तुपकरांनी दिली आहे. Unkown person burn soyabean in farm of Ravikant Tupkar

रविकांत तुपकरांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 11:07 AM

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या शेतातील सोयाबीन गंजीला आग लावल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तुपकर यांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Unkown person burn soyabean in farm of Ravikant Tupkar)

रविकांत तुपकर यांच्या शेतातील 65 ते 70 क्विंटल सोयाबीनच्या गंजीला आग लावल्याने साधारण 3 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. ही घटना 16 ऑक्टोबरच्या रात्री घडली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी मागणी तुपकर यांनी केली.

बुलडाणा तालुक्यातील सावळा येथे रविकांत तुपकर यांची शेती आहे. स्वत: तुपकर, त्यांच्या पत्नी शर्वरी, आई-वडील आणि भाऊ यांच्या नावावर ही शेती आहे, हे सर्वजण मिळून शेती करतात. यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीन पेरले होते. नुकतेच सोयाबीन सोंगून शेतात गंजी लावून ठेवले होते. मात्र, रविकांत तुपकर यांच्या सावळा येथील शेतातील सोयाबीन गंजीला रात्री आग लावण्यात आलीय.

सोयाबीनच्या गंजीला आग लावण्याचा प्रकार राजकीय वैमनस्याचा असून ज्यांना समोरासमोर लढायची हिंमत नसते, अशा व्यक्तींनी ही आग लावण्याचे काम केले आहे. कितीही त्रास देण्याचे प्रयत्न केले, तरी माझा आवाज दाबता येणार नाही, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली.

आई वडिलांनी मेहनतीनं पीक आणलं होतं. अतिवृष्टीमुळे शेतकरी वाईट परिस्थितीत असून त्यांना आधाराची गरज आहे. अशा वेळी सोयाबीन पेटवल्यामुळे शेतकरी भयभीत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीवंर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तुपकरांनी केली.

संबंधित बातम्या : 

‘लॉकडाउनचा फटका शेती उत्पादनाला, डिझेल-पेट्रोल मिळेना’ : रविकांत तुपकर

Onion Export Ban | वाजपेयींप्रमाणे मोदींचं सरकारही शेतकरीच पाडणार : रविकांत तुपकर

(Unkown person burn soyabean in farm of Ravikant Tupkar)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.