AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु, थिएटर्स, शाळा बंदच

5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. (Unlock 5 Guidelines Hotel And Raustaurant Will Start From 5 October)

Unlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु, थिएटर्स, शाळा बंदच
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Sep 30, 2020 | 8:35 PM
Share

मुंबई :  राज्य सरकारने अनलॉक 5 साठी महत्त्वाच्या गाईडलाईनस जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट बंद होते. मात्र अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना आता 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. (Unlock 5 Guidelines Hotel And Raustaurant Will Start From 5 October)

राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु करायला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तसंच अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग देखील सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर देखील कसलेही निर्बंध आता नसणार आहेत.

मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तर पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसंच मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या वाहतूकीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी घालण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे बंद राहतील. तसंच मेट्रो वाहतूक देखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही. सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना देखील 31 ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

काय सुरु?

  • 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय
  • राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु
  • अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरु करण्यास परवानगी
  • ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाही
  • मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
  • पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय
  • मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी

काय बंदच?

  • सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंद
  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद
  • मेट्रो वाहतूक देखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही
  • सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

यासगळ्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आणि कार्यपद्धतीचे पालन करणे अनिवार्य राहील.

संबंधित बातम्या

Unlock 4 | ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार

Unlock-4 : थिएटर उघडण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली, मेट्रोही धावण्याची शक्यता, अनलॉक 4 मध्ये काय सुरु होणार?

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...