AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्षात गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 5 नवीन कार लाँच होणार

नवीन वर्षात गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी (New car launch in 2020) आहे. कारण 2020 मधील पहिल्या महिन्यात 5 नवीन गाड्या लाँच होणार आहेत.

नववर्षात गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 5 नवीन कार लाँच होणार
| Updated on: Dec 23, 2019 | 8:05 PM
Share

नवी दिल्ली : नवीन वर्षात गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी (New car launch in 2020) आहे. कारण 2020 मधील पहिल्या महिन्यात 5 नवीन गाड्या लाँच होणार आहेत. यात बहुप्रतिक्षित प्रीमियम हॅचबॅक, सब कॉम्पॅक्ट सिडेन, प्रीमियम एमपीवी आणि इलेक्ट्रीक एसयूवीचा (New car launch in 2020) समावेश आहे. या सर्व गाड्या Tata, Hyundai, Kia Seltos, MG Hector यासारख्या कंपन्यांच्या आहेत.

Hyundai aura : hyundai ने नुकतंच आपल्या सब कॉम्पॅक्ट सिडैन गाडीबाबत माहिती दिली आहे. ही गाडी 21 जानेवारी 2020 ला लाँच होणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, hyundai ने ऑरा 12 सेगमेंट फर्स्ट फीचर्स मिळणार आहे. यात अँड्राईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबत 8 इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, प्रीमिअम साऊंड सिस्टम, वायरलेस चार्जिंगसोबत इतर फीचर्सचाही समावेश आहे. याशिवाय यात 3 बीएस 6 कम्प्लायंट इंजिनचा पर्याय असेल. तसेच 1.2 लीटर पेट्रोल, 1.2 लीटर डिझेल आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. या गाडीची किंमत 6-9 लाखापर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाटा अल्ट्रॉज : टाटा मोटार्सची बहुप्रतिक्षित प्रीमिअम हॅचबॅक अल्ट्रॉज 22 जानेवारीला लाँच होणार आहे. मारुती बलेनो आणि hyundai आय 20 यासारख्या गाड्यांना टक्कर देणारी ही गाडी बीएस 6 कम्प्लायंट पेट्रोल आणि डिझेल इंजिनसोबत येईल. याचे पेट्रोल इंजिन 1.2 लीटर आहे. 1199 cc चे हे इंजिन 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच यात डिझेल वर्जनमध्ये 1.5 लीटर टर्बो इंजिन दिले आहे. या गाडीची किंमत 5-8 लाख रुपयापर्यंत असण्याची शक्यता वर्तवली (New car launch in 2020) जात आहे.

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक : टाटा मोर्टासने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV नेक्सॉन ईवी लाँच होणार असल्याचे सांगण्यात आले. यात जिप्ट्रॉन इलेक्ट्रिक पावरट्रेन टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे टाटा मोटारच्या गाडीत ही टेक्नॉलॉजी लावण्यात येणार आहे. ही गाडी जानेवारी महिन्यात लाँच होणार आहे. यात 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. यात इलेक्ट्रिक एसयूवीसोबत स्टँडर्ड एसी चार्जर आणि डीसी फास्ट चार्जरने चार्ज करता येऊ शकते. याला एकदा चार्ज केल्यानंतर ती 300 किमीपर्यंत चालते. याची किंमत 15-17 लाख रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

एमजी जेडएस ईवी : हेक्टरने जेडएस ईवी इलेक्ट्रिक एसयूवी एमजी मोटार का भारतातील ही दूसरी गाडी आहे. एमजीने आपल्या इलेक्ट्रिक एसयूवी गाडीला 5 डिसेंबरला लाँच होणार असल्याची घोषणा केली होती. याची लाँचिग जानेवारी 2020 ला होणार आहे. यात इलेक्ट्रिक मोटार 143 ps पावर आणि 353Nm चा पीक टॉर्क जेनरेट करतो. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 340 किलोमीटरपर्यंत चालेल.

किआ कार्निवल : सेल्टॉस एसयुवीनंतर किआ मोटार्स आता प्रीमियम एमपीवी गाडी बाजारात आणणार आहे. किआ मोटार्सची ही दुसरी गाडी आहे. यात लग्जरी एमपीवी 6, 7 आणि 8 सीटर सीटिंग ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत. यात बीएस 6 कम्पायलंट 2.2 लीटर डीझेल इंजिन मिळेल. याची किंमत 27 लाखापर्यंत असल्याचं बोललं जात आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.