भारताची लष्करी ताकद वाढणार; अमेरिकेसोबत 663 कोटी रुपयांच्या डीलला मंजुरी

भारतीय सीमेवर चीन आणि पाकिस्तानकडून होत असलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ( US approves sale of USD 90 million worth of military equipment and services to India)

भारताची लष्करी ताकद वाढणार; अमेरिकेसोबत 663 कोटी रुपयांच्या डीलला मंजुरी
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 7:50 PM

नवी दिल्ली: भारतीय सीमेवर चीन आणि पाकिस्तानकडून होत असलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक विमाने आणि उपकरणे दाखल होणार आहेत. त्यासाठी भारताने अमेरिकेसोबत 663 कोटी रुपयांची डील केली आहे. या डीलनुसार भारताच्या ताफ्यात सी-130 सुपर हरक्युलिस विमान दाखल होणार आहे. त्यामुळे भारताचं लष्करी बळ वाढणार आहे. ( US approves sale of USD 90 million worth of military equipment and services to India)

अमेरिकेच्या सरंक्षण विभागाच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीनुसार ही प्रस्तावित विक्री अमेरिका-भारताच्या राजनैतिक संबंधांना अधिक मजबूत करेल. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेलाही त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय मोठ्या संरक्षण भागिदारीच्या सुरक्षेतही मोठी सुधारणा होणार आहे. तसेच हिंद महासागर आणि दक्षिण आशियाई क्षेत्रात राजनैतिक स्थायित्व, शांतता आणि आर्थिक प्रगतीबाबत मोठी शक्ती म्हणून भारताचा दबदबा राहणार आहे.

विमानांचे पार्टही मिळणार

भारताने अमेरिकेकडे विमानाचे सामान (पार्ट) आणि विमानाच्या दुरुस्तीशी संबंधित सामान, अत्याधुनिक रडार वॉर्निंग रिसीव्हर शिपसेट, दहा लाईटव्हेट नाईट व्हिजन बायनोकुलर, 10 एन/ एव्हीएस-9 नाईट व्हिजन गॉगल, जीपीएस, इलेक्ट्रॉनिक युद्धास्त्र आदींची मागणी केली होती. अमेरिकेने त्याला मंजुरी दिली आहे. आधी खरेदी करण्यात आलेले भारतीय हवाई दलाचे विमान, सेना आणि नौदलाच्या वस्तुंची वाहतूक, स्थानिय आणि आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ, क्षेत्रीय आपत्ती संबंधीच्या वस्तू आदी गरजा पूर्ण करण्यास या प्रस्तावित लष्करी साहित्याची मदत होईल, असं पेंटॅगॉननं म्हटलं आहे.

आणीबाणीत विमाने सज्ज राहणार

वाहतूक आणि इतर सेवांच्या सामानांच्या या डीलमुळे सी-130 जे परिवहन विमानांना आणीबाणीच्या परिस्थितीत सज्ज ठेवण्यास मदत होणार आहे. हवाई दल आपल्या विमानांना मिशनच्या अनुषंगानेच नेहमी सज्ज ठेवू शकणार आहेत. या प्रस्तावित विक्रीमुळे भारतीय क्षेत्रात सैन्य संतुलनात कोणताही बदल होणार नाही, असं पेंटॉगॉनने म्हटलं आहे. या खरेदी-विक्री प्रक्रियेत लॉकहीड मार्टीन कंपनी ही कंत्राटदार असेल. ( US approves sale of USD 90 million worth of military equipment and services to India)

संबंधित बातम्या:

गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांचा जीव घेणारी हिंसक झटापट चीनच्या ‘षडयंत्रा’चा भाग, US काँग्रेस पॅनलचा दावा

भारताविरोधात चीनची नवी चाल, ब्रह्मपुत्रा नदीवर ड्रॅगन उभारणार ‘सुपर डॅम’

भारत-अमेरिका एकत्र येऊन चीनचा विरोध करणार, अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नेत्याचे वक्तव्य

( US approves sale of USD 90 million worth of military equipment and services to India)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....