US Election 2020 : अमेरिकेत निकालाला उशीर झाल्यास असंतोषाची शक्यता : फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग

अमेरिकेत निवडणुकीच्या (US Election 2020) निकालापूर्वी फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी गंभीर इशारा दिलाय.

US Election 2020 : अमेरिकेत निकालाला उशीर झाल्यास असंतोषाची शक्यता : फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग

वॉशिंग्टन : अमेरिकेत निवडणुकीच्या (US Election 2020) निकालापूर्वी फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी गंभीर इशारा दिलाय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या काळात अमेरिकन नागरिकांकडून असंतोष व्यक्त केला जाऊ शकतो, अशी शंका झुकरबर्ग यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही निवडणूक फेसबुकसाठी देखील एक परीक्षा असल्याचं म्हटलं आहे (US election 2020 Mark Zuckerberg says risk of civil unrest around result).

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg on US Election 2020) म्हणाले, “आपला देश विभागलेला दिसत आहे याची मला काळजी वाटते. जर निवडणुकीला काही दिवसांचा अथवा आठवड्याचा उशीर झाला तर नागरिकांमधून असंतोष व्यक्त होऊ शकतो. पुढील आठवडा फेसबुकसाठी अग्निपरीक्षा घेणारा असणार आहे. आतापर्यंत फेसबुकने केलेल्या कामावर आम्हाला अभिमान आहे. 3 नोव्हेंबरनंतरही आमचं काम सुरुच राहिल.”

दरम्यान, फेसबुकवर अमेरिकेसह अन्य देशांच्या मागील निवडणुकांवर प्रभाव टाकत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप झालेला आहे. याच काळात केंब्रिज अनालिटिका प्रकरणात फेसबुकच्या वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर झाल्याचाही आरोप झाला. त्यामुळे फेसबुकवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यामुळे यावेळी फेसबुकने असं होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारतात देखील नुकतीच संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान समितीने फेसबुक इंडियाच्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली आहे. यानंतर फेसबुक इंडियाच्या पॉलिसी प्रमुख यांना आपला राजीनामा द्यावा लागला.

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान हिंसाचाराची शक्यता

याआधी देखील अमेरिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडू शकतात अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकन नागरिकांना देखील निवडणूक निकालानंतर हिंसाचार भडकण्याची भीती आहे. यावर FBI आणि NSA सारख्या सुरक्षा संस्थांनी एक अहवाल देखील दिलाय. यानंतर अमेरिकेची काळजी वाढली आहे. जुलै 2020 मध्ये ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या वर्णभेदाविरुद्धच्या आंदोलनात देखील वॉशिंग्टनमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. आता निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा हिंसक घटना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

US Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

US Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून?

US Election : कमला हॅरिस यांना दुर्गा माता आणि ट्रम्प यांना महिषासुर दाखवणाऱ्या फोटोवरुन वाद

US election 2020 Mark Zuckerberg says risk of civil unrest around result

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI