आधी इशारा, आता आदेश, ‘WHO’च्या निधीला डोनाल्ड ट्रम्प यांची स्थगिती

जर 'WHO' ने वेळेत योग्य प्रतिसाद दिला असता तर, 'कोरोना'चा उद्रेक होण्याऐवजी उगमावेळीच तो आटोक्यात आणता आला असता, असं ट्रम्प म्हणाले (Donald Trump Halts US Payments to WHO)

आधी इशारा, आता आदेश, 'WHO'च्या निधीला डोनाल्ड ट्रम्प यांची स्थगिती
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 5:41 PM

वॉशिंग्टन : ‘जागतिक आरोग्य संघटने’ला (WHO) पाठवला जाणारा निधी तात्पुरता थांबवा, असे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत. ‘कोरोना व्हायरस’च्या भीषणतेविषयी चीनचे पोकळ दावे सत्य मानून, माहिती देण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ट्रम्प यांनी ‘WHO’वर ठेवला आहे. (Donald Trump Halts US Payments to WHO)

“जागतिक आरोग्य संघटना आपल्या मूलभूत कर्तव्याचं पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे. यासाठी त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे. जर ‘WHO’ ने योग्य वेळेत प्रतिसाद दिला असता, तर ‘कोरोना’चा उद्रेक होण्याऐवजी उगमावेळीच तो आटोक्यात आणता आला असता.’ असं ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले

‘जागतिक आरोग्य संघटने’ला दिल्या जाणाऱ्या निधीवर वचक ठेवण्याचे कितपत अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आले आहेत, हे अस्पष्ट आहे. मात्र या निधीला मिळालेली स्थगिती 60 दिवसांसाठी असेल, असे अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सूचित केल्याचं वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिलं आहे. अमेरिकेने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत ‘WHO’च्या कार्यात 893 दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले आहे.

हेही वाचा : कोरोनाबाबत लपवाछपवी, चीनला गंभीर परिणाम भोगावे लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

दरम्यान, ‘कोरोना विषाणूंविरुद्धच्या लढ्यात जागतिक आरोग्य संघटना किंवा इतर कोणत्याही मानवतावादी संघटनेच्या कामकाजाची संसाधने कमी करण्याची ही वेळ नाही’ असं संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले. जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations- UN) ची आरोग्य संघटना आहे. ‘विषाणू आणि त्याचे भयानक परिणाम रोखण्यासाठी एकता दाखवत आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रितपणे काम करण्याची ही वेळ आहे’ असंही गुटेरेस म्हणाले.

हेही वाचा :  ‘WHO’ला चीनचा पुळका, तुमचा निधीच रोखतो, डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी

‘WHO’ला कोणाकडून किती निधी? (Donald Trump Halts US Payments to WHO)

अमेरिका – 22 टक्के चीन – 12 टक्के जपान – 8.6 टक्के जर्मनी – 6.1 टक्के इतर सदस्य देश – 51.3 टक्के

दुसरीकडे, ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ‘संकटाच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेला जाणारा निधी थांबवणे अतिशय धोकादायक आहे. त्यांच्या कार्यामुळे कोविड19 चा प्रसार कमी होत आहे. जर त्यांचे काम थांबवले, तर इतर कोणतीही संस्था त्यांची जागा घेऊ शकत नाही. पूर्वीपेक्षा आता जगाला ‘WHO’ची जास्त गरज आहे, असं मत बिल गेट्स यांनी व्यक्त केलं आहे.

(Donald Trump Halts US Payments to WHO)

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.