योगी सरकारचा मोठा निर्णय, अन्य राज्यात अडकलेल्या यूपीच्या मजुरांना आणण्याची तयारी

लॉकडाऊनदरम्यान देशभरातील विविध भागांमध्ये अडकून पडलेल्या (UP government planning for stuck laborers) उत्तर प्रदेशच्या मजुरांसाठी योगी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

योगी सरकारचा मोठा निर्णय, अन्य राज्यात अडकलेल्या यूपीच्या मजुरांना आणण्याची तयारी

लखनऊ : लॉकडाऊनदरम्यान देशभरातील विविध भागांमध्ये अडकून पडलेल्या (UP government planning for stuck laborers) उत्तर प्रदेशच्या मजुरांसाठी योगी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या मजुरांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे, अशा मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे (UP government planning for stuck laborers).

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (24 एप्रिल) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत त्यांनी याबाबत निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखल्या जाव्यात, असा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

“इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांच्या टेस्टिंगची सुविधा व्हाव्यात, त्यांना सुखरुप उत्तर प्रदेशमध्ये आणलं जाईल. उत्तर प्रदेशमध्ये हे मजुर आल्यानंतर त्यांना बसमार्फत त्यांच्या जिल्ह्यात किंवा गावात पोहोचवलं जाईल”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

जगभरात थैमान घालणारा कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खबरदारी म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केलं. या लॉकडाऊनदरम्यान देशातील सर्व राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. त्यामुळे लाखो मजुर विविध राज्यांमध्ये अडकले. या मजुरांच्या जेवणाची आणि इतर व्यवस्था त्याभागाताली राज्य सरकार करत आहेत.

लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशचे अनेक मजूर अडकून पडले आहेत. त्यांची योग्यप्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन त्यांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. उद्धव ठाकरे यांनी मजुरांना सर्व गोष्टींची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, राजस्थानच्या कोटामध्ये काही मुलं अडकली होती. या मुलांनी उत्तर प्रदेश सरकारकडे गावी परत जाण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली होती. योगी आदित्यनाथ यांनी या मुलांची व्यवस्था करत त्यांना घरी पोहोचलं. त्यामुळे विरोधकांनीदेखील योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं कौतुक केलं.

विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून देशभरात अडकलेल्या मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करुन याबाबत मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मजुरांना राज्यात परत आणण्यासाठी पावलं उचलली आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI