Corona | नागपूरकरांना दिलासा! भाजी, दूध, औषधींची होम डिलिव्हरी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

लॉकडाऊनदरम्यान कुणीही व्यक्ती घराबाहेर पडू नये, यासाठी नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या सुविधेसाठी प्रयत्न करत आहेत.

Corona | नागपूरकरांना दिलासा! भाजी, दूध, औषधींची होम डिलिव्हरी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय


नागपूर : लॉकडाऊनदरम्यान कुणीही व्यक्ती (Vegetable-Milk Home Delivery) घराबाहेर पडू नये, यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुविधेसाठी निरनिराळे प्रयत्न करत आहेत. काही औषधी दुकाने 24 तास सुरु ठेवण्याचा आणि शहरातील 45 दुकानातून घरपोच किराण्याची व्यवस्था केल्यानंतर आता भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळण्याचीही व्यवस्था मनपा आयुक्त तुकाराम मुंढे (IAS Tukaram Munde) यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून (Vegetable-Milk Home Delivery) करण्यात आली आहे.

शहरालगतच्या गावातील शेतकऱ्यांशी कृषी विभागाच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला असून त्यांना फोन केला की त्यांच्या माध्यमातून भाजीपाला घरपोच उपलब्ध होणार आहे. याचप्रकारे दूधविक्रेते आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांशीही चर्चा करुन हे पदार्थही घरपोच मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी सुमारे 140 विक्रेत्यांची यादी मोबाईल क्रमांकासह प्राप्त झाली असून ही यादी मनपाच्या अधिकृत वेबसाईट आणि फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. ह्या यादीमधील मोबाईल क्रमांकावर फोन करुन नागरिकांना आता भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ घरीच मागवता येतील.

कृषी विभागाच्या सहकार्यानेसुध्दा शेतकरी भाजीपाला नागपूरच्या विविध भागात उपलब्ध करणार आहे. त्यांची देखील यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. (Vegetable-Milk Home Delivery) शहरातील रामदासपेठ, रविनगर, लकडगंज, मेडिकल चौक अशा मुख्य परिसरातील दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांचा घरपोच सेवा देणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

15 एप्रिलपर्यंत अनावश्यक कामासाठी मुळीच बाहेर पडू नये. कोरोनापासून बचावासाठी ही सोय आहे. त्यामुळे या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्यात येणार

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम अग्निशमन वाहनाव्दारे हाती घेण्याचे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले.

अग्निशमन वाहनामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार करुन संपूर्ण शहराच्या दहाही झोनमध्ये फवारणी प्रारंभ करण्यात येणार आहे. विशेषकरुन ज्या भागात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. अशा परिसरात फवारणी केली जावी, असेही निर्देश आयुक्तांनी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी, मुख्य अग्निशमन (Vegetable-Milk Home Delivery) अधिकारी यांना दिले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI